शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शिक्षण शुल्काबाबत आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:11 IST

यासंदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी तहसीलदार राहुल कोताडे यांना निवेदन दिले आहे. ज्या सुविधा गेल्या वर्षभर वापरल्या नाहीत, त्या ...

यासंदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी तहसीलदार राहुल कोताडे यांना निवेदन दिले आहे. ज्या सुविधा गेल्या वर्षभर वापरल्या नाहीत, त्या सुविधांचेदेखील शुल्क मागील वर्षी शिक्षण संस्थांनी वसूल केले. संकटाच्या काळामध्ये शिक्षणासारख्या पवित्र व्यवसायामध्ये संस्था नफेखोरीचे धोरण सोडायला तयार नाहीत. शिक्षण संस्थांच्या या आडमुठे धोरणाच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मैदानात उतरली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभर ‘एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे यांच्या मार्गदर्शनाखाली आक्रमक भूमिका घेणार असल्याचे तालुकाध्यक्ष सौरभ नाठे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे, प्रमोद सांगळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सौरभ नाठे, मेघा दराडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

इन्फो

शुल्क निश्‍चिती प्रक्रिया राबवावी

ज्या सुविधा विद्यार्थी वापरत नसतानाही शिक्षण संस्था त्याचे शुल्क आकारत असतील तर अशा संस्थांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. शिक्षण शुल्क समितीने लवकरात लवकर राज्यातील सर्व शिक्षण संस्थांच्या शुल्कनिश्‍चितीची प्रक्रिया करून नवीन शुल्क घोषित करावे. तोपर्यंत कोणत्याही पालकांकडून शिक्षण संस्थांना शुल्क आकारण्याचा हक्क नाही, असा आदेश काढावा. केंद्र सरकारने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज योजना लागू करण्याचे निर्देश द्यावेत. नर्सरी ते दहावीचे शिक्षण देणार्‍या शिक्षण संस्थांनी शैक्षणिक साहित्य शाळेतूनच घेण्याची सक्‍ती करू नये आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

फोटो : ०४ सिन्नर राष्ट्रवादी

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शिक्षण शुल्काबाबत तहसीलदार राहुल कोताडे यांना निवेदन देताना प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे, प्रमोद सांगळे, तालुकाध्यक्ष सौरभ नाठे, मेघा दराडे आदी.

===Photopath===

040621\04nsk_20_04062021_13.jpg

===Caption===

फोटो : ०४ सिन्नर राष्ट्रवादी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने शिक्षण शुल्काबाबत तहसीलदार राहूल कोताडे यांना निवेदन देताना  प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे, प्रमोद सांगळे, तालुकाध्यक्ष सौरभ नाठे, मेघा दराडे आदी