नाशिक : गंगापूररोडवरील आर्किटेक्ट महाविद्यालयात रॅगिंगच्या कथित प्रकरणाबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्राचार्यांना घेराव घालून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. आर्किटेक्ट महाविद्यालयात दुपारी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या रॅगिंगप्रकरणी प्राचार्य प्राजक्त बस्ते यांच्याशी चर्चा करून संघटनेकडे प्राप्त झालेल्या तक्रारीची माहिती दिली. शिष्टमंडळाने याप्रकरणी निवेदन दिल्यानंतर प्राचार्य बस्ते यांनी एक समिती गठित करून या प्रकारणाची चौकशी केली जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. संबंधितांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष चिन्मय गाढे यांनी दिला. यावेळी महेश सोनवणे, समीर रत्नपारखी, प्रथमेश बोरकर अभिजित दरगोडे, भूषण पाटील, रोहित सांगले, हर्षवर्धन सूर्यवंशी आदि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, याप्रकरणी प्राचार्य यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. (प्रतिनिधी)
रॅगिंगप्रकरणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे निवेदन
By admin | Updated: August 4, 2015 22:28 IST