शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बालेकिल्ला राखण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज

By admin | Updated: February 16, 2017 23:08 IST

सत्तासंघर्ष : राजकीय समीकरणांकडे तालुक्याचे लक्ष

 महेश गुजराथी  चांदवडबालेकिल्ला असलेला दुगाव गट राखण्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेससमोर आव्हान उभे ठाकले असून, हा गट भाजपा किंवा शिवसेनेकडे जातो हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या गटात दोन तालुकाध्यक्ष व शिवसेनेचे नेते, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष अशी चौरंगी लढत होत असून, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. दुगाव गटात काही गावे नव्याने समाविष्ट झाली आहेत. त्यात दुगाव जिल्हा परिषद गट सर्वसाधारण झाल्याने इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. यापूर्वी हा गट अनुसूचित जमातीसाठी राखीव होता. तो सर्वसाधारण झाल्याने या गटात चुरशीची लढत होत आहे. या गटात पूर्वी २२ गावे होती. आता ही संख्या २८ झाली आहे. दुगावात यापूर्वीचे वागदर्डी, रापली, वडगावपंगू, कातरवाडी ही गावे आता तळेगावरोही गटात गेली आहे, तर वडबारे नांदूरटेक, इंद्रायवाडी, राजदेरवाडी, हरणूल, हरसूल, अहिरखेडे, पिंपळगाव धाबळी, गंगावे, पाथरशेंबे ही दहा गावे आता नव्याने समाविष्ट झाली आहेत. विशेषत: दुगाव पंचायत समिती गणात सोळापैकी दहा गावे हे नवीन असल्याने राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत. २००७ साली या दुगाव गटाने माजी आमदार शिरीष कोतवाल यांचे राजकीय पुनर्वसन केले व गटातून जनतेने निवडून दिले. त्यावेळी डॉ. सयाजीराव गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस) व शिरीष कोतवाल (काँग्रेस) अशी लढत झाली होती; मात्र कोतवाल निवडून आले व ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले होते. याच गटातून आता राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील शेलार, शिवसेनेचे प्रा. राजेंद्र सोमवंशी, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र गांगुर्डे अशी चौरंगी लढत होत आहे. या सर्व उमेदवारांनी गटातील जनतेच्या दोन वेळा भेटी घेतल्या. प्रचार दौरे होत आहेत; मात्र या गटातील पाणीप्रश्न व रस्त्यांची समस्या सर्वात जुनी आहे. याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे गटातील मतदारांचे म्हणणे आहे. यावेळी तीन तालुकाध्यक्ष व शिवसेना अशी लढत होणार असल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेस गट ताब्यात ठेवतो की भाजपा शिवसेनेकडे देतो हे येत्या २३ फेब्रुवारीला समजणार आहे.