शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्मारक भूमिपूजन निमित्ताने राष्ट्रवादीतील गटबाजी उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 18:02 IST

सटाणा : दोन दिवसांपूर्वी शहरातील देवमामलेदार यशवंत महाराज यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त झालेल्या राज्यपालांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या स्वागताला पक्षाचे पदाधिकारी गैरहजर राहिल्याने पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

ठळक मुद्देसटाणा : स्वागताला पदाधिकारी गैरहजर

सटाणा : दोन दिवसांपूर्वी शहरातील देवमामलेदार यशवंत महाराज यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त झालेल्या राज्यपालांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या स्वागताला पक्षाचे पदाधिकारी गैरहजर राहिल्याने पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.शहराचे ग्रामदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी पालकमंत्री छगन भुजबळ होते. प्रोटोकॉलनुसार बागलाणचे आमदार दिलीप बोरसे हे जरी भाजपचे आमदार असले तरी त्यांनी राज्यपाल यांच्यासह पालकमंत्री भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे यांचे स्वागत केले तर दुसरीकडे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, तालुकाप्रमुख सुभाष नंदन यांनी सेनेचे मंत्री भुसे यांचे जंगी स्वागत केले. मात्र राष्ट्रवादीची जबाबदारी सांभाळणार्‍या स्थानिक पदाधिकार्‍यांनी भुजबळ यांच्या दौर्‍याकडे पाठ फिरवल्याचे बघायला मिळाले. त्यांच्या स्वागतासाठी ना पक्षाचे तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी हजर राहिले ना कार्यक्रमाच्या ठिकाणी. स्थानिक पदाधिकार्‍यांच्या या भूमिकेमुळे समता परिषद व भुजबळ समर्थकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. या कृतीमुळे राष्ट्रवादीतील गटबाजीही चव्हाट्यावर आली आहे. दरम्यान, एका पुढार्‍याने भाजप-सेनेचा हा कार्यक्रम असल्याने त्या कार्यक्रमाला कोणीही जाऊ नये असे फर्मान काढल्याची चर्चा सध्या तालुक्यात रंगली आहे. त्या पुढार्‍याच्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.कोट.....शहराचे ग्रामदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांचा धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे सर्वच पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांना स्वतः व्यक्तिगत निमंत्रण देण्यात आले होते. राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांना तसेच त्यांच्या पक्षाचे माजी आमदार यांनादेखील तीनवेळा आपण निमंत्रण दिले होते.- सुनील मोरे, नगराध्यक्ष, सटाणा

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीPoliticsराजकारण