नाशिक : कोपर्डी येथे घडलेली घटना अत्यंत निंदनीय असून, या घटनेमुळे समाजातील महिला तसेच मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. कोपर्डीसारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येऊन उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या घटनेतील दोषी व्यक्तींना तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच महिलांना स्वसंरक्षणासाठी बंदुकीचा परवाना मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी गुरब्रितकौर बिंद्रा, रंजना गांगुर्डे, शब्बाना खान, अंजुम खान, मनीषा जेठवा, निमा जवांदे, छाया ठाकूर, प्रिती खैरनार आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
By admin | Updated: July 26, 2016 00:13 IST