शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
3
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
4
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
5
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
6
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
7
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
8
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
9
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
10
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
11
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
12
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
13
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
14
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
15
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
16
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
17
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
18
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
19
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
20
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

राष्ट्रवादी शहराध्यक्ष कोशिरेंचा राजीनामा लोकसभा निवडणूक : जिल्हाध्यक्षही संकटात

By admin | Updated: May 22, 2014 00:01 IST

नाशिक : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाल्याने पक्षात अस्वस्थता, असंतोषाचे वातावरण आहे. त्यातच पक्षाचे शहराध्यक्ष शरद कोशिरे यांनी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा सादर केला. त्यामुळे आता जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांचे पदही धोक्यात आले आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाल्याने पक्षात अस्वस्थता, असंतोषाचे वातावरण आहे. त्यातच पक्षाचे शहराध्यक्ष शरद कोशिरे यांनी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा सादर केला. त्यामुळे आता जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांचे पदही धोक्यात आले आहे.लोकसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांचा सामना शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्याशी झाला. त्यात भुजबळ यांचा साधा नाही तर १ लाख ८७ हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळे पक्षीय पातळीवरदेखील झाडाझडती घेतली जात असून, अनेक पदाधिकार्‍यांना अहवाल सादर करण्यास सांगितले जात आहे. तथापि, शहराध्यक्ष शरद कोशिरे यांनी आज पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा दिला आहे. आपल्याला कोणी राजीनामा देण्यास सांगितलेले नाही. तथापि, पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. शहराध्यक्षपदाच्या कालावधीत राबविलेल्या उपक्रमांच्या माहितीचा अहवाल त्यांनी सादर केला आहे. कोशिरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता कोणाची विकेट पडणार, अशी चर्चा सुरू असून, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांचे पदही धोक्यात असल्याचे बोलले जात आहे. येत्या शुक्रवारी (दि.२३) मुंबईत राज्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेस पदाधिकार्‍यांची बैठक होणार असून, त्यात काय निर्णय होतो, यावर जिल्हाध्यक्षांचे भवितव्य अवलंबून आहे....तर सविस्तर अहवाल देऊलोकसभा निवडणुकीतील पराभवाचा अहवाल अद्याप सादर केलेला नाही की कोणावर दोषरोपही केलेले नाही. केवळ शहराध्यक्ष म्हणून केलेल्या कामांचा अहवाल सादर केला आहे. पक्षाने विचारणा केली तर लोकसभा निवडणुकीबाबतही सविस्तर अहवाल सादर केला जाईल.- शरद कोशिरे