निवडणूक परिणाम : जिल्हाध्यक्षही संकटातलोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मोठय़ा मताधिक्याने पराभव झाल्याने पक्षात अस्वस्थता, असंतोषाचे वातावरण आहे. त्यातच पक्षाचे शहराध्यक्ष शरद कोशिरे यांनी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा सादर केला. त्यामुळे आता जिल्हाध्यक्ष अँड. रवींद्र पगार यांचे पदही धोक्यात आले आहे.लोकसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांचा सामना शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्याशी झाला. त्यात भुजबळ यांचा साधा नाही तर १ लाख ८७ हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळे पक्षीय पातळीवरदेखील झाडाझडती घेतली जात असून, अनेक पदाधिकार्यांना अहवाल सादर करण्यास सांगितले जात आहे. तथापि, शहराध्यक्ष शरद कोशिरे यांनी आज पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा दिला आहे. आपल्याला कोणी राजीनामा देण्यास सांगितलेले नाही. तथापि, पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. शहराध्यक्षपदाच्या कालावधीत राबविलेल्या उपक्रमांच्या माहितीचा अहवाल त्यांनी सादर केला आहे. सदरचा अहवाल दिला असला तरी त्यात लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या मुद्यांचा मात्र समावेश नाही.कोशिरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता कोणाची विकेट पडणार, अशी चर्चा सुरू असून, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांचे पदही धोक्यात असल्याचे बोलले जात आहे. येत्या शुक्रवारी (दि.२३) मुंबईत राज्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेस पदाधिकार्यांची बैठक होणार असून, त्यात काय निर्णय होतो, यावर जिल्हाध्यक्षांचे भवितव्य अवलंबून आहे. (प्रतिनिधी) सविस्तर अहवाल देऊलोकसभा निवडणुकी -तील पराभवाचा अहवाल अद्याप सादर केलेला नाही की कोणावर दोषरोपही केलेले नाही. केवळ शहराध्यक्ष म्हणून केलेल्या कामांचा अहवाल सादर केला आहे. पक्षाने विचारणा केली तर लोकसभा निवडणुकीबाबतही सविस्तर अहवाल सादर केला जाईल.- शरद कोशिरे
राष्ट्रवादी शहराध्यक्ष कोशिरेंचा राजीनामा
By admin | Updated: May 22, 2014 22:16 IST