शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

पिंजाळ-देवनदी लिंकसाठी राष्ट्रीय पथक नाशकात

By admin | Updated: January 8, 2016 23:47 IST

सिन्नर येथे केली पाहणी

नाशिक : सिन्नर तालुक्यासारख्या दुष्काळग्रस्त भागासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या पिंजाळ - देवनदी लिंक योजनेंतर्गत पाच टीएमसी पाणी उचलण्याच्या प्रकल्पासाठी शुक्रवारी (दि. ८) राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाच्या (एम.डब्ल्यू.टी.ए.) अधिकाऱ्यांसह खासदार हेमंत गोडसे यांनी सिन्नर तालुक्यात पाहणी केली.त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी शिखरावरून गोदावरी व वैतरणा या दोन नद्यांचा उगम झाला आहे. त्यातील गोदावरी पूर्वेकडे, तर वैतरणा दक्षिणवाहिनी नदी असल्याने काही अंतरावरच ठाणे जिल्ह्यातून तिचे पाणी समुद्राला मिळते. पिंजाळ आणि गारगाई या तिच्या उपनद्या आहेत. या उपखोऱ्यात पाण्याची उपलब्धता असूनही त्याचा वापर होत नसल्याने ते पाणी समुद्राला मिळते. त्यामुळे हे पाणी वळवून अथवा उचलून प्रवाही पद्धतीने अपर वैतरणा प्रकल्पात सोडण्यात येईल. तेथून ते कडवा नदीत सोडण्यात येईल. त्यानंतर बोगदा अथवा कालव्याद्वारे ते सिन्नरच्या देवनदीत टाकण्याचा पिंजाळ-देवनदी लिंक योजनेचा उद्देश आहे. देवनदी सिन्नरच्या बहुतांश भागातून प्रवाही असल्याने त्याचा या तालुक्याच्या शेती उद्योगांना मोठा लाभ होईल. तसेच या नदीत पाच टीएमसी पाणी उपलब्ध होऊन सिन्नर तालुक्यातील दुष्काळी भागाची समस्या दूर होईल. तसेच मुंबई-दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये समाविष्ट होणाऱ्या बारागावप्रिंपी, पास्ते तसेच संबंधित भागालाही त्याचा लाभ होऊ शकेल, असा प्रस्ताव खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्र सरकारला सादर केला होता. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाचे हैदराबाद येथील अधिकारी कार्यकारी अभियंता शरण्णाप्पा यांनी मेरी तसेच हायड्रोलॉजी विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सिन्नर तालुक्यात केलेल्या पाहणी दौऱ्यात जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव हेही उपस्थित होते. या प्रकल्पाच्या उपयुक्ततेचा फिजीबलिटीचा अहवाल हे पथक केंद्र सरकारला सादर केल्यावर त्याचा मान्यतेचा निर्णय घेण्यात येईल, असे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)