शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात राष्टÑीय लोकअदालत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:41 IST

न्यायालयीन दाव्यांमुळे दुरावलेले नातेसंबंध, वेळेचा व पैशांचा होणारा अपव्यय लक्षात घेता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणमार्फत आयोजित करण्यात येणाºया राष्ट्रीय लोकअदालती या पक्षकारांसाठी वरदान ठरत आहेत़ गत दोन वर्षांमध्ये नाशिक जिल्ह्यातील सुमारे पाच हजार दावे निकाली काढण्यात आले असून, येत्या ९ सप्टेंबरला पुन्हा राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे़ या लोकअदालतीमध्ये जास्तीत पक्षकारांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी केले आहे़

नाशिक : न्यायालयीन दाव्यांमुळे दुरावलेले नातेसंबंध, वेळेचा व पैशांचा होणारा अपव्यय लक्षात घेता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणमार्फत आयोजित करण्यात येणाºया राष्ट्रीय लोकअदालती या पक्षकारांसाठी वरदान ठरत आहेत़ गत दोन वर्षांमध्ये नाशिक जिल्ह्यातील सुमारे पाच हजार दावे निकाली काढण्यात आले असून, येत्या ९ सप्टेंबरला पुन्हा राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे़ या लोकअदालतीमध्ये जास्तीत पक्षकारांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी केले आहे़राष्ट्रीय लोकअदालतीची माहिती देण्यासाठी मंगळवारी (दि़८) शिंदे यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते़ त्यावेळी शिंदे यांनी सांगितले की, ‘भांडणापेक्षा समझोता बरा, मिळेल त्यातच आनंद खरा’ हे ब्रीद समोर ठेवून लोकअदालतींमध्ये काम केले जाते़ न्यायालयातील प्रलंबित खटल्याची वाढती संख्या, न्यायाधीशांची कमी संख्या यामुळे न्यायदानास विलंब होतो़ जिल्ह्यात आजमितीस १ लाख ५४ हजार केसेस प्रलंबित असून ही संख्या कमी करण्यासाठी तसेच जलद न्यायासाठी लोकअदालत हे प्रभावी माध्यम आहे़ न्यायासाठी पक्षकारांना न्यायालयाचे खेटे मारावे लागतात त्यामुळे आजोबांनी दाखल केलेला दावा नातवापर्यंत चालू असतो, असे गमतीने म्हटले जाते़ न्यायालयातील हे प्रलंबित खटले निकाली निघावेत तसेच पक्षकारांना जलद न्याय मिळावा, त्यांच्यातील आपसी संबंध टिकून राहावेत यासाठी लोकअदालत सुरू झाली़ या लोकअदालतीमध्ये दावा दाखलपूर्व व दावा दाखल दिवाणी स्वरूपाचे तसेच भारतीय दंड विधानातील तडतोडीचे खटले दाखल करता येतात़ लोकअदालतीचे वैशिष्ट्य म्हणजे या एकाच दिवसात व जागेवरच दाव्याचा निकाल लागतो़ तसेच न्यायालयात दाव्यापोटी भरलेली कोर्ट फीदेखील परत मिळते, शिवाय या निर्णयाला अपीलही नसते़ येत्या ९ सप्टेंबरला होणाºया लोकअदालतीमध्ये आतापर्यंत ९ हजार दावे ठेवण्यात आले असून, ही संख्या ५० हजारापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे नाशिक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस. एम. बुक्के यांनी सांगितले. यावेळी न्यायाधीश एस. टी. डोके, न्यायाधीश जी. पी. देशमुख, एम. एस. बोधनकर उपस्थित होते.