शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय लोकअदालतीत १२ हजार ५१४ दावे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 23:42 IST

नाशिक : जिल्हा व सत्र न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवारी (दि़ ८) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत १२ हजार ५१४ दावे निकाली निघाले असून, यामध्ये दावा दाखलपूर्व १० हजार ५९७ प्रकरणे, तर न्यायालयातील प्रलंबित एक हजार ९१७ प्रकरणांचा समावेश आहे़ विशेष म्हणजे या राष्ट्रीय लोकअदालतीत प्रलंबित व दावा दाखलपूर्व प्रकरणांमध्ये १६ कोटी ९७ लाख ३५ हजार ७८७ रुपयांची तडजोड रकमेची वसुली झाली आहे़

ठळक मुद्देजिल्हा न्यायालय : १६ कोटी ९७ लाख रुपयांची तडजोड वसुली

नाशिक : जिल्हा व सत्र न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवारी (दि़ ८) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत १२ हजार ५१४ दावे निकाली निघाले असून, यामध्ये दावा दाखलपूर्व १० हजार ५९७ प्रकरणे, तर न्यायालयातील प्रलंबित एक हजार ९१७ प्रकरणांचा समावेश आहे़ विशेष म्हणजे या राष्ट्रीय लोकअदालतीत प्रलंबित व दावा दाखलपूर्व प्रकरणांमध्ये १६ कोटी ९७ लाख ३५ हजार ७८७ रुपयांची तडजोड रकमेची वसुली झाली आहे़प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी राष्ट्रीय लोकअदालतीत सहभागी होऊन पक्षकारांना आपसातील वाद मिटविण्याचे आवाहन केले होते़ शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी सहा हजार ६७० प्रकरणे, तर दावा दाखलपूर्व ८९ हजार ४५८ प्रकरणे ठेवण्यात आली होती़ दावा दाखल प्रकरणांमध्ये सात कोटी २२ लाख ८९ हजार ४०६ रुपये, मोटार अपघात प्रकरणांमध्ये दोन कोटी ७३ लाख ८१ हजार ५१९ रुपये, एनआय अ‍ॅक्टमध्ये चार कोटी ३० लाख ७६ हजार ६ असे एकूण ९ कोटी ७४ लाख ४६ हजार ३८१ रुपयांची नुकसानभरपाई व दंडापोटी वसुली करण्यात आली आहे़ प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश शिंदे, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव सुधीर बुक्के, जिल्ह्णातील सर्व न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी यांचे परिश्रम तसेच वकील व पक्षकारांनी केलेल्या सहकार्यामुळे राष्ट्रीय लोकअदालतीत दावे निकाली काढण्यात यश मिळाले़न्यायासाठी वर्षानुवर्षे तिष्ठत बसलेल्यांसाठी राष्ट्रीय लोकअदालत ही सुवर्णसंधी असून, पक्षकारांनी याचा लाभ घेतला आहे़ यापुढील लोकअदालतींनाही पक्षकारांना चांगला प्रतिसाद दिल्यास न्यायालयावरील ताण कमी होईलच, शिवाय न्यायही झटपट मिळेल़ न्यायाधीश, वकील, पक्षकार, न्यायालयीन कर्मचारी यांच्या सहकार्यामुळेच दावे निकाली काढण्यात यश मिळाले आहे़- सूर्यकांत शिंदे, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश