शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये पुढिल महिन्यात राष्ट्रीय लोकअदालत : सूर्यकांत शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 23:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : न्यायालयीन दाव्यांमुळे दुरावलेले नातेसंबंध, वेळेचा व पैशांचा होणारा अपव्यय लक्षात घेता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत आयोजित करण्यात येणाºया राष्ट्रीय लोकअदालती या पक्षकारांसाठी वरदान ठरत आहेत़ गत दोन वर्षांमध्ये नाशिक जिल्ह्यातील सुमारे पाच हजार दावे निकाली काढण्यात आले असून, येत्या ९ सप्टेंबरला पुन्हा राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात ...

ठळक मुद्दे ९ सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजनपक्षकारांना सहभागी होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : न्यायालयीन दाव्यांमुळे दुरावलेले नातेसंबंध, वेळेचा व पैशांचा होणारा अपव्यय लक्षात घेता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत आयोजित करण्यात येणाºया राष्ट्रीय लोकअदालती या पक्षकारांसाठी वरदान ठरत आहेत़ गत दोन वर्षांमध्ये नाशिक जिल्ह्यातील सुमारे पाच हजार दावे निकाली काढण्यात आले असून, येत्या ९ सप्टेंबरला पुन्हा राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे़ या लोकअदालतीमध्ये जास्तीत पक्षकारांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी केले आहे़राष्ट्रीय लोकअदालतीची माहिती देण्यासाठी मंगळवारी (दि़८) शिंदे यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते़ त्यावेळी शिंदे यांनी सांगितले की, ‘भांडणापेक्षा समझोता बरा, मिळेल त्यातच आनंद खरा’ हे ब्रीद समोर ठेवून लोकअदालतींमध्ये काम केले जाते़ न्यायालयातील प्रलंबित खटल्याची वाढती संख्या, न्यायाधीशांची कमी संख्या यामुळे न्यायदानास विलंब होतो़ जिल्ह्यात आजमितीस १ लाख ५४ हजार केसेस प्रलंबित असून ही संख्या कमी करण्यासाठी तसेच जलद न्यायासाठी लोकअदालत हे प्रभावी माध्यम आहे़न्यायासाठी पक्षकारांना न्यायालयाचे खेटे मारावे लागतात त्यामुळे आजोबांनी दाखल केलेला दावा नातवापर्यंत चालू असतो, असे गमतीने म्हटले जाते़ न्यायालयातील हे प्रलंबित खटले निकाली निघावेत तसेच पक्षकारांना जलद न्याय मिळावा, त्यांच्यातील आपसी संबंध टिकून राहावेत यासाठी लोकअदालत सुरू झाली़ या लोकअदालतीमध्ये दावा दाखलपूर्व व दावा दाखल दिवाणी स्वरूपाचे तसेच भारतीय दंड विधानातील तडतोडीचे खटले दाखल करता येतात़