शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

राष्ट्रीय मधुमेह परिषदेस प्रारंभ

By admin | Updated: June 8, 2014 00:40 IST

मधुमेह संशोधन केंद्रासाठी सहकार्य : जामकर

 नाशिक : मधुमेहाची मोठी समस्या जगभरात निर्माण झाली आहे़ यामध्ये भारतात याचे प्रमाण खूप मोठे असून, यावरील औषधोपचार सर्वसामान्य नागरिकांनाही स्वस्तात उपलब्ध व्हावेत़, यासाठी मधुमेह संशोधन केंद्रासाठी मुंबईत जागा तसेच इतर उभारणी करण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ अरुण जामकर यांनी येथे व्यक्त केले़

असोसिएशन आॅफ फिजीशियन्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या राज्यस्तरीय मधुमेह परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ डॉ़ जामकर व उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले़ डॉ़ जामकर म्हणाले, मधुमेह निवारण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठही प्रयत्न करत आहे़ रुग्णांसाठी औषधोपचार उपलब्ध करणे हा एक भाग असला तरी मधुमेह होऊ नये म्हणून सर्वसामान्यांची जनजागृती करण्यासाठी विद्यापीठ भर देणार आहे़ आरोग्य विज्ञान विद्यापीठात मधुमेह आजारासाठी दोन अभ्यासक्रम सुरू आहेत़ अधिक सखोल नवीन अभ्यासक्रम तयार करण्याचीही विद्यापीठाची तयारी असून, यासाठी तज्ज्ञांनी पुढे येण्याची गरज आहे़ ग्रामीण भागातील रुग्णांना मधुमेहाच्या औषधांचा लाभ व्हावा, माहिती व्हावी यासाठी अशा परिषदा प्रत्येक जिल्हानिहाय होणे गरजेचे आहे़डॉ़ शशांक जोशी म्हणाले, नाशिक जशी धार्मिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहे तशी ती भारताची वैद्यकीय शिक्षणाची राजधानी व्हावी व यासाठी आरोग्य विद्यापीठाने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली़ याप्रसंगी असोसिएशन आॅफ फिजीशियन्सचे अध्यक्ष डॉ़ संजीव इंदूरकर, डॉ़ विजय पणीकर, डॉ़ समर बॅनर्जी, डॉ़ मृणाली केळकर, डॉ़ राहुल पाटील व्यासपीठावर उपस्थित होते़ (प्रतिनिधी)