शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

 कवडीमोल भावाने द्राक्षपंढरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:37 IST

सायखेडा : नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असणाऱ्या द्राक्षाला कवडीमोल भाव मिळत असल्याने द्राक्षपंढरी म्हणून ओळख असणाऱ्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अवकाळी पाऊस आणि बेमोसमी गारपीट यापासून वाचलेले द्राक्ष यंदा कमी भावात विक्र ी करावी लागत आहे.

ठळक मुद्देउत्पादक हवालदिल : मागणी नसल्याने घसरणभाजीपाला, कांद्यापाठोपाठ द्राक्षांकडूनही निराशाच

बाजीराव कमानकर ।सायखेडा : नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असणाऱ्या द्राक्षाला कवडीमोल भाव मिळत असल्याने द्राक्षपंढरी म्हणून ओळख असणाऱ्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अवकाळी पाऊस आणि बेमोसमी गारपीट यापासून वाचलेले द्राक्ष यंदा कमी भावात विक्र ी करावी लागत आहे.कांद्यापाठोपाठ द्राक्षाने कमरडे मोडल्यानेयंदाचे वर्ष शेतकऱ्यांच्या आर्थिकदृष्ट्या मानगुटीवर बसणारे निघाल्याने शेतकरी पुरता हतबल झालाआहे. द्राक्षे खरेदीसाठी व्यापारी बागेत फिरकत नसल्याने द्राक्षे घेतं का कुणी, द्राक्ष घेतं का कुणीअशी बळजबरी करण्याची वेळ बागायतदारांवरआली आहे, तर ज्यांची बागा सुरू आहे. त्यांनाअवघे १५ ते २० रुपये किलो इतका कमी भाव मिळत आहे.निर्यातक्षम द्राक्ष ३५ ते ४० रुपये किलो दराने खरेदी सुरू असली तरी एक एकर बागेतून अवघा ४० टक्के माल हार्वेस्टिंग करून शिल्लक राहिलेल्या माल विक्री होत नाही तर काही बागा व्यापारी खरेदी करण्यासाठी येत नसल्याने बेदाणा बनविण्यासाठी १० ते १४ रुपये भावात विकावा लागत असल्याने कधी नव्हे असा वाईट प्रसंग शेतकºयांवर आला आहे.द्राक्ष चांगले उत्पादन देणारे एकमेव पीक असल्याने शेतकºयांचे आर्थिक गणित अवलंबून असते. मुलांचे शिक्षण, लग्न, कुटुंबासाठी येणारा दैनंदिन खर्च, दुकानदारांची देणेदारी असे सर्व गणित अवलंबून असते. यंदाचा खर्चदेखील वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. - कैलास डेर्ले, शिंगवेद्राक्ष कवडीमोल भावात विक्र ी होत असल्याने शेतकºयांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे. उधारीत घेतलेल्या औषधांची वसुली थांबली आहे. शेतकरी दुकानाकडे पाठ फिरवत असल्याने दुकानदारी तोट्यात आली आहे. औषध कंपन्यांनी मात्र तगादा लावला आहे.- शरद शिंदे, औषध विक्रेतेकांद्यापाठोपाठ द्राक्षाच्या कोसळणाºया बाजारभावाने शेतकºयांचे आर्थिक कमरडे मोडले. दोन पिकात शेतकरी भुईसपाट झाला आहे. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे कर्ज वाढले आहे. दुकानदार उधारीसाठी तगादा लावत आहे. सरकारकडून कोणताही दिलासा मिळाला नाही, कर्जमाफीच्या नियमात बसलो नसल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. - सुदाम खालकर, द्राक्ष उत्पादक शेतकरीद्राक्षबागांकडे व्यापाºयांची पाठकाळी कसदार जमीन, मुबलक पाणी, शेतकºयांना कर्ज देणाºया बँक असल्याने तालुक्यातील ७० टक्के शेतकरी द्राक्ष लागवडीकडे वळाले आहेत. तरु ण पिढी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्यातक्षम द्राक्ष पिकवत आहे.द्राक्ष लागवडीसाठी एकरी किमान पाच लाख रु पये खर्च येतो. त्यानंतर उत्पादनासाठी वर्षाला एकरी २ ते अडीच लाख रु पयांचा खर्च येतो. त्यामुळे महागडे आणि पैसे मिळवून देणारे पीक म्हणून द्राक्षांकडे पाहिले जाते.यंदा कोणत्याही भागात गारपीट झाली नाही. बेमोसमी पाऊस पडला नाही. त्यामुळे द्राक्षाचे भरघोस उत्पादन निघाले, शिवाय उत्तर भारतात सर्वत्र थंडीची लाट आली होती. अजूनही अनेक भागात हिमवृष्टी सुरू आहे त्यामुळे द्राक्षाला उठाव नाही.