शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘शेल्टर’मधून नाशिक चे ब्रॅँडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:12 IST

क्रेडाईतर्फे होऊ घातलेल्या शेल्टर प्रदर्शनातून नाशकातील निवास, उद्योग, साहित्य-संस्कृती, शिक्षण, कृषी, पर्यावरण व पर्यटन आदी क्षेत्रांतील सुविधा आणि संधींचे बँडिंग होणार असल्याचा विश्वास क्रेडाईच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केला आहे.

नाशिक : क्रेडाईतर्फे होऊ घातलेल्या शेल्टर प्रदर्शनातून नाशकातील निवास, उद्योग, साहित्य-संस्कृती, शिक्षण, कृषी, पर्यावरण व पर्यटन आदी क्षेत्रांतील सुविधा आणि संधींचे बँडिंग होणार असल्याचा विश्वास क्रेडाईच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केला आहे.  क्रेडाईतर्फे दि. २१ ते २५ डिसेंबर दरम्यान डोंगरे वसतिगृह मैदानावर शेल्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, यात तीनशेहून अधिक उद्योग व्यावसायिक सहभागी होणार आहेत. यासंबंधी आयोजित एडिटर्स मिटमध्ये माहिती देताना क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल व प्रदर्शनाचे समन्वयक उदय घुगे यांनी सदर एक्स्पो हा केवळ बांधकाम व्यावसायिकांसाठी नसून याद्वारे एकूणच नाशिक शहरातील विविध क्षेत्रांतील सेवा- सुविधांचे ब्रँडिंग करण्याचा मानस व्यक्त केला. नोकरी, उद्योग, शिक्षणासाठी नाशिकमध्ये स्थलांतरित होणाºयांचे प्रमाण मोठे आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सोयी-सुविधांनी नाशिक परिपूर्ण असून, हीच बाब या प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  शासनाच्या सुवर्ण त्रिकोणात असलेला नाशिकचा समावेश, समृद्धी महामार्ग तसेच लवकरच सुरू होऊ घातलेली विमानसेवा यामुळे नाशकात उद्योग भरभराटीच्या तसेच रोजगाराच्या संधी वाढणार असून, त्याचा परिणाम रहिवासी क्षेत्र विस्तारण्यावरही होणार आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायाला पुन्हा चांगले दिवस येण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. शेल्टरचे सचिव उमेश वानखेडे, हेमंत पारख, अविनाश आव्हाड, सचिन बागड, प्रशांत पाटील, दीपक हांडगे, माधव बोधले, रोहन कुटे, अतुल अक्कडकर, ऋषीकेश कोते आदींसह क्रेडाईचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.बांधकाम व्यवसायाला प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षाराज्यातील मेट्रो शहरांच्या तुलनेत नाशिकमधील हवामान रहिवासासाठी उत्तम असून तुलनेने घरांच्या किमतीही परवडणाºया आहेत. नाशकातील मूलभूत सुविधाही पुरेशा प्रमाणात असून, शहराचे ब्रँडिंग योग्य पद्धतीने झाले तर बांधकाम व्यवसायालाही प्रोत्साहन मिळून सदनिकांची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. बांधकाम व्यवसायावर अवलंबून असणाºया अनेक घटकांनाही याचा लाभ होणार आहे.