शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

स्वच्छता मोहिमेतही ‘थर्ड पार्टी’ हवी कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 18:35 IST

नाशिक : सांडपाणी नियोजन, शौचालये, घनकचरा व्यवस्थापन, पाणी स्वच्छता आणि आरोग्य यांचा समन्वय साधून गावाला स्वच्छ करण्यासाठी तिसऱ्याच कुणीतरी ...

नाशिक : सांडपाणी नियोजन, शौचालये, घनकचरा व्यवस्थापन, पाणी स्वच्छता आणि आरोग्य यांचा समन्वय साधून गावाला स्वच्छ करण्यासाठी तिसऱ्याच कुणीतरी येऊन आपल्या गावाला धडे द्यावेत हे कुणालाही आवडणार नाही. त्यातच जिल्हा परिषदसारखी मजबूत यंत्रणा अशा त्रयस्थाच्या (एजंट) माध्यमातून ग्रामपंचायतींना स्वच्छ करणार असेल तर मग अशा व्यवस्थेला आपोआपच मान्यताही मिळते. महाराष्टÑात लोकसहभागातून स्वच्छ आणि सुंदर गाव निर्माण करणाºया हिरवेबाजार, राळेगणसिद्धी आणि औरंगाबाद तालुक्यातील पाटोदा या गावांनी राज्यात आपला ठसा उमटविला आहे. पाटोदा गावाची महती, तर थेट राष्टÑपतींपर्यंत पोहचली आहे. या गावांंच्या पावलावर पाऊल ठेवत राज्यातील जवळपास २५ तरी गावे अशी आहेत की त्यांनी लोकसहभागूत गावाचा शाश्वत विकास केला आहे. माणसाला माणसे जोडून विकासाची नवी परिभाषा निर्माण केलेली आहे. राज्यातच अशा गावांचा आदर्श असताना जिल्हा परिषद मात्र गावात राबविण्यात येणाºया कोणत्याही योजनेसाठी ‘थर्ड पार्टी’ एजंटच्या भरवशावर का आहे याचा मात्र उलगडा होत नाही. पाणी स्वच्छ असो की शौचालय, आरोग्य यंत्रणा असोत की शिक्षण यामध्ये एखासी संस्था काय सुचविणार. वर्षानुवर्ष जिल्हा परिषद योजना रोबविण्याबरोबरच तळागाळापर्यंत पोहचलेली असताना नव्याने या एजंट म्हणून कंपन्या कुठून उगवल्या हे मात्र उमगत नाही.गोदाकाठावरील गावे स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त होण्याबरोबरच गोदावरीही कशी प्रदूषणमुक्त राहिली याचे नियोजन खासगी कंपन्यांकडे सोपविले जाणार आहे म्हणे. म्हणजे वर्षानुवर्ष जिल्हा परिषदा नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याबरोबरच गावाच्या विकासाठी नियोजनात्मक आणि योजनात्मक काम करीत असताना अलीकडे मात्र खासगी कंपन्या अशा प्रकारची भूमिका बजावत आहेत. म्हणजे गावाची पाहणी करून या कंपन्या ठरविणार की गावाच्या विकासासाठी काय करावे आणि किती निधी लागेल. खरेतर खात्यातच इतकी अनुभवी माणसे आणि जिल्ह्याची स्वतंत्र यंत्रणा असतांना कुण्या तिसºयाने का म्हणून विकासाची वाट दाखवावी. खरेतर कागदोपत्री कतीही सुंदर रांगोळ्या काढल्या तरी प्रत्यक्षात तेथील भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक रचनेवर विकासाचा बराचसा भाग अवलंबून असतो. केवळ ठोकताळा येथे लागू पडत नाही. तसे असते तर राज्यातील आदर्श गावे ही एजंटांच्या कामगिरीवरच ठरली असती.लोकसहभागातून लोकचळवळी उभ्या राहिल्या आहेत. यातून अनेक कामे घडून आली आहेत. नियोजन करण्यापेक्षा प्रत्यक्षातील कामांनी अनेक गावांनी देशात आदर्श निर्माण केला आहे. गावकºयांनी ठरविले तर काहीही होऊ शकते. ‘काय करील ‘राव’, जे करील गाव’ असे ग्रामीण भागात म्हटले जाते ते उगाच नाही. एखादी व्यक्ती किंवा संस्था काहीही करू शकत नाही. लोकभावना आणि लोकांची मानसिकता तितकीच महत्त्वाची असते. कोणत्याही मध्यस्थाविनालोकसहभागीतून अशाप्रकारचे रचनात्मक काम होऊ शकते हे महाराष्टÑाने पाण्याच्या मोहिमेतून पाहिले आहेच.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद