शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांत मिळणार वाहन परवाना, नोंदणी प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 22:25 IST

नाशिक : प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) व पोस्ट खाते यांच्यातील असमन्वयामुळे वाहनचालकांना वाहन परवाना व नवीन वाहन नोंदणी प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या़ या असमन्वयाची प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दखल घेऊन वाहनचालकांना दहा दिवसांत वाहन परवाना व वाहन नोंदणी प्रमाणपत्र मिळेल, अशी नवीन यंत्रणा सुरू ...

ठळक मुद्दे मोबाइल क्रमांकावर अर्ज मंजूर झाल्याचा संदेश संदेश मिळाल्यापासून दहा दिवसांत वाहन परवानानिवासस्थानाजवळील पोस्ट खात्यात संपर्क

नाशिक : प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) व पोस्ट खाते यांच्यातील असमन्वयामुळे वाहनचालकांना वाहन परवाना व नवीन वाहन नोंदणी प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या़ या असमन्वयाची प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दखल घेऊन वाहनचालकांना दहा दिवसांत वाहन परवाना व वाहन नोंदणी प्रमाणपत्र मिळेल, अशी नवीन यंत्रणा सुरू केली आहे़

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील विविध अडचणींचा सामना केल्यानंतर वाहनचालक परीक्षेचे अग्निदिव्य पार करतात़ मात्र, यानंतर वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी आरटीओ आणि टपाल खात्याच्या चकरा माराव्या लागतात़ त्यातच टपाल खात्याकडून पत्ता चुकीचा आहे, घरी कोणी नव्हते, घरच सापडले नाही अशी विविध कारणे देत काही दिवसांनंतर संबंधित वाहन परवाना वा वाहन नोंदणी प्रमाणपत्र पुन्हा आरटीओकडे जमा केले जाते़ तर अनेकदा यासाठी आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतो़

प्रादेशिक परिवहन अधिकारी कळसकर व पोस्ट विभाग यांनी परवाना वाटप कार्यपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल केला आहे़ आरटीओत अर्ज सादर केल्यानंतर त्यावरील आवश्यक कामकाज पूर्ण करून तीन दिवसांत अर्जदाराचा चालक वाहन परवाना वा नोंदणी प्रमाणपत्र तयार करून पोस्ट विभागास अर्जदाराच्या पत्त्यावर बटवडा करण्यासाठी हस्तांतरित करतील़ त्यानंतर पोस्ट विभागाकडून पुढील आवश्यक कारवाई करून ते अर्जदाराच्या वास्तव्याच्या पत्त्यावर सात दिवसांचे आत बटवडा करणार आहेत़ ज्या अर्जदाराचे चालक परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र काही कारणास्तव बटवडा न झाल्यास ते अर्जदाराच्या वास्तव्याच्या पत्त्याच्या परीक्षेत्रामधील पोस्ट कार्यालयात सात दिवसांसाठी ठेवण्यात येईल़ त्यानंतर ते प्रादेशिक परिवहन कार्यालयात परत पाठविण्यात येणार आहे़

प्रादेशिक परिवहन कार्यालयात ज्या अर्जदारांनी नवीन वाहनचालक परवाना किंवा नवीन वाहन नोंदणीसाठी अर्ज केल्यानंतर त्यांच्या मोबाइल क्रमांकावर त्यांचा अर्ज मंजूर झाल्याचा संदेश मिळणार आहे. हा संदेश मिळाल्यापासून दहा दिवसांत त्यांचा वाहन परवाना किंवा नवीन वाहन नोंदणी प्रमाणपत्र न मिळाल्यास अर्जदारांनी त्यांच्या निवासस्थानाजवळील पोस्ट खात्यात संपर्क करावा. या ठिकाणी नोंदणी प्रमाणपत्र किंवा परवाना न मिळाल्यास प्रादेशिक परिवहन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन कळसकर यांनी केले आहे.