लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातील सातपूर व सिडको परिसरातील महिलांचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली असून, याप्रकरणी दोन संशयितांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पवननगर परिसरातील ३४ वर्षीय महिलेस अश्लील मॅसेज पाठवून विनयभंग केल्याची घटना घडली आहे़ महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित प्रकाश वसंत चौधरी (६२, रा. कामटवाडा, सिडको) याने २८ जुलै ते ४ आॅगस्ट यादरम्यान मोबाइलवर अश्लील मॅसेज पाठविले़ तसेच सातत्याने पाठलाग करून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले़ याप्रकरणी अंबड पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून संशयित चौधरी यास अटक केली आहे.सातपूर परिसरातील आयटीआय कॉलनीतील एका ३२ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना गुरुवारी (दि़३) सकाळच्या सुमारास घडली़ महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास संशयित लक्ष्मण देवरे याने रस्त्यात अडवून प्रेम असल्याचे सांगत शरीरसंबंध तसेच घर चांगल्या किमतीमध्ये विकून देईल असे सांगून अश्लील कृत्य केले़ याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात महिलांचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 17:21 IST
शहरातील सातपूर व सिडको परिसरातील महिलांचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली असून, याप्रकरणी दोन संशयितांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
शहरात महिलांचा विनयभंग
ठळक मुद्देअश्लील मॅसेज पाठवून विनयभंगरस्त्यात अडवून प्रेम असल्याचे सांगत