शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर जबरी लुटीतील पाच आरोपींना सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 21:38 IST

नाशिक : श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी आलेल्या भाविकाला मारहाण करून लुटणाऱ्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाच आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ टी़ पाण्डेय यांनी सोमवारी (दि़२६) प्रत्येकी दोन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़

ठळक मुद्देरस्त्यात अडवून जबर मारहाण२३ हजार रुपये किमतीचा मोबाइलची लूट

नाशिक : श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी आलेल्या भाविकाला मारहाण करून लुटणाऱ्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाच आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ टी़ पाण्डेय यांनी सोमवारी (दि़२६) प्रत्येकी दोन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़

१२ आॅगस्ट २०१३ रोजी प्रकाश विनायक मोरे हे श्रावणी सोमवारनिमित्त ब्रह्मगिरीला पायी फेरी मारण्यासाठी गेले होते़ वाडीव-हे पोलीस ठाणे हद्दीतील खडवाडी शिवारात पहिणे खोडवे रोडवरून मोरे हे पायी जात असताना संशयित विष्णू नानासीराम पेहरे, बाळू मनाजी पेहरे, अंकूश काळू पेहरे, गणपत त्र्यंबक पेहरे व यशवंत चंदर पेहरे (सर्व रा़ खडकवाडी, ता़ त्र्यंबकेश्वर, जि़नाशिक) यांनी रस्त्यात अडवून जबर मारहाण केली़ तसेच मोरे यांच्याकडील २३ हजार रुपये किमतीचा मोबाइलची लूट केली़

या प्रकरणी मोरे यांनी वाडीव-हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपींवर जबरी लूट व दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या खटल्यात सरकारी वकील अ‍ॅड़ वाय़ डी़ कापसे यांनी न्यायालयात सादर केलेल्या सबळ पुराव्यान्वये न्यायाधीश पांडे यांनी या पाचही आरोपींना दोन वर्षे सक्तमजुरी, प्रत्येकी दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली़ या खटल्यात सरकारी वकील कापसे यांना पैरवी अधिकारी बी़ एऩ सांगळे यांनी मदत केली़

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय