शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘पाप्या’च्या खुनाचा बदला घेण्यासाठीच पवारवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 23:04 IST

नाशिक : पेठरोड परिसरातील सराईत बालगुन्हेगार हृतिक ऊर्फ पाप्या राजू शेरगिल याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याचा भाऊ हरीश ऊर्फ हºया शेरगिल याने आपल्या सहा साथीदारांसमवेत खुनातील प्रमुख संशयित चेतन संजय पवार (१७, शनिमंदिराशेजारी, पेठरोड, नाशिक) याच्यावर तिबेटीयन मार्केटमध्ये प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले आहे़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जिवे ठार ...

ठळक मुद्देसरकारवाडा पोलीसठाणे तिबेटीयन मार्केटमध्ये प्राणघातक हल्लाचार संशयित ताब्यात

नाशिक : पेठरोड परिसरातील सराईत बालगुन्हेगार हृतिक ऊर्फ पाप्या राजू शेरगिल याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याचा भाऊ हरीश ऊर्फ हºया शेरगिल याने आपल्या सहा साथीदारांसमवेत खुनातील प्रमुख संशयित चेतन संजय पवार (१७, शनिमंदिराशेजारी, पेठरोड, नाशिक) याच्यावर तिबेटीयन मार्केटमध्ये प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले आहे़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ शनिवारी (दि़१९) सायंकाळी पवार याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती़७ फेबु्रवारी २०१७ रोजी पेठरोडवरील मोती सुपर मार्केटजवळ पाप्या शेरगिल याचा खून करण्यात आला़ या खुनातील प्रमुख संशयित चेतन पवार याची शनिवारी (दि़१९) उंटवाडीतील बाल न्याय मंडळात तारीख होती़ त्यासाठी पवार हा आपल्या आई-वडिलांसमवेत तारखेसाठी हजर होता़ यानंतर तिबेटीयन मार्केटमध्ये कपडे खरेदीसाठी गेलेल्या चेतन पवार याच्या मागावर असलेले संशयित विक्की बाळू जाधव ऊर्फ काळ्या तोतरा, पाप्याचा भाऊ हरीश ऊर्फ हºया शेरगिल, रोहन अहिरे, राकेश पवार, गौतम ताठे, ललित ऊर्फ लल्या सुरेश राऊत व अजय भईटा या संशयितांनी चाकू, कोयता व चॉपरने डोके व पाठीवर वार केले़या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या चेतन पवार यास प्रथम जिल्हा रुग्णालय व त्यानंतर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ दरम्यान, याप्रकरणी संजय रामलाल पवार यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात फिर्याद दिली आहे़ दरम्यान, सरकारवाडा पोलिसांनी संशयित हरीश ऊर्फ हºया शेरगिल व ललित ऊर्फ लल्या सुरेश राऊत यांच्यासह आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे़