शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथियांनाही कायद्याचे समान संरक्षण : बुक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 23:18 IST

नाशिक : देशातील सर्व नागरिक हे कायद्याने समान असून तृतीयपंथिय हेदेखील समाजाचा एक भाग आहे़ त्यांनाही कायद्याचे संरक्षण असून त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांनी दाद मागावी असे आवाहन जिल्हा न्यायालयातील विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस़एम़बुक्के यांनी केले़ कोजागरी पौर्णिमेचे औचित्य साधून सप्तशृंग गडावर देवीच्या पूजेसाठी देशभरातून आलेल्या तृतीयपंथीयासाठी आयोजित ...

ठळक मुद्दे तृतीयपंथिय हेदेखील समाजाचा एक भागतृतीय पंथियांमध्ये समानतेची भावना निर्माण होणे गरजेचे

नाशिक : देशातील सर्व नागरिक हे कायद्याने समान असून तृतीयपंथिय हेदेखील समाजाचा एक भाग आहे़ त्यांनाही कायद्याचे संरक्षण असून त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांनी दाद मागावी असे आवाहन जिल्हा न्यायालयातील विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस़एम़बुक्के यांनी केले़ कोजागरी पौर्णिमेचे औचित्य साधून सप्तशृंग गडावर देवीच्या पूजेसाठी देशभरातून आलेल्या तृतीयपंथीयासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़

सप्तशृंगी गडावर कोजगरी पौर्णिमेला देवीच्या पूजेसाठी देशभरातील तृतीयपंथीय या दिवशी एकत्र येतात़ तृतीयपंथीयांना समाजात वावरताना येणाºया अडचणी तसेच कायद्याने दिलेले सर्वांना समान अधिकार याबाबत माहिती मिळाली यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी बुक्के यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, तृतीयपंथीयांना नेहेमी समाजाकडून त्रास सहन करावा लागतो़ त्यांच्यासोबत दडपशाही व भेदभाव हा ठरलेलाच असतो़ तृतीयपंथियांचे कुटुंबदेखील त्यांचे हक्क डावलतात़ स्त्री-पुरुष असो की तृतीयपंथी हे सर्व समाजाचे घटक असून सर्वांना कायद्याने समान अधिकार दिले आहेत़ या तृतीय पंथियांमध्ये समानतेची भावना निर्माण होणे गरजेचे असल्याचे बुक्के यांनी यावेळी सांगितले़

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमास सुमारे दीडशेहून अधिक तृतीयपंथी उपस्थित होते़ यावेळी रुग्णालयांमध्ये तृतीयपंथियांसाठी स्वतंत्र रुम आणि स्वतंत्र सार्वजनिक शौचालय असावे अशी अपेक्षा काही तृतीयपंथियांनी व्यक्त केली़.