शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

व्यक्तिचित्र, शिल्पांचा जिवंत आविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 18:43 IST

नाशिक : मातीला आकार देणारे कुशल हात आणि कॅनव्हॉसवर लीलया फिरणाऱ्या ब्रशने व्यक्तिचित्र आणि शिल्पांचा जिवंत कलाविष्कार नाशिककरांनी रविवारी ...

ठळक मुद्देपोट्रेट : जगप्रसिद्ध चित्रकार मायकेल अ‍ॅँजेलो यांचा स्मृतिदिन

नाशिक : मातीला आकार देणारे कुशल हात आणि कॅनव्हॉसवर लीलया फिरणाऱ्या ब्रशने व्यक्तिचित्र आणि शिल्पांचा जिवंत कलाविष्कारनाशिककरांनी रविवारी अनुभवला. समोरील सजीव मॉडेलची विविध कोणातून साकारलेल्या कलाकृतीने कलावंतांची प्रतिभा अधिकच बहरली. निमित्त होतं जगप्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार मायकेल अ‍ॅँजोलो यांच्या स्मृतिदिनाचे.पोट्रेट आर्टिस्ट ग्रुप मुंबई व नाशिक आर्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शंकराचार्य संकुल येथे या कलासोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकसह महाराष्टÑातून आलेल्या २८ चित्रकार व शिल्पकारांनी प्रत्यक्ष मॉडेलवरून लाईव्ह व्यक्ती आणि शिल्पचित्रे एकाचवेळी साकारून नाशिककरांची मने जिंकली. या विनामूल्य स्पर्धेसाठी नाशिकसह औरंगाबाद, कोल्हापूर, ठाणे, पुणे, मुंबई, अमरावती येथील स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांनी जलरंग, तैलरंग, अ‍ॅक्रेलिक कलर्स, आॅइल पेंट्स माध्यमातून प्रत्यक्ष मॉडेलवरून व्यक्तिचित्रे साकारली.शिल्प कलाकारांनीदेखील अत्यंत कौशल्यपूर्ण आणि एकाग्रतेने शिल्पे साकारली. शाडूच्या मातीतून आठ शिल्पकारांनी प्रत्यक्ष व्यक्तिशिल्पे साकारली. लाईव्ह व्यक्तिचित्रण व शिल्प निर्मितीचे सुरुवातीपासून ते शेवटपर्यत कलात्मक जडणघडण उपस्थित नाशिककरांनी आणि कलावंतांनीही अनुभवली. स्पर्धेचा हा पहिला टप्पा असून, यातील विजेत्या स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड केली जाणार आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिकartकला