शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या तनिषा कोटेचाला सबज्युनियरचे विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 18:59 IST

नाशिक : नाशिक जिमखाना येथे सुरू असलेल्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या तनिषा कोटचेने हिने सबज्युनिअरचे विजेतेपट पटकाविले.नाशिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने नाशिक जिमखाना येथे आयोजित तिसऱ्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस मानांकन स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी ज्युनियर, सबज्युनियर, कॅडेट आणि मिडजेट या चारही गटांचे अंतिम सामने खेळविले गेले. यामध्ये ...

ठळक मुद्दे तिसरी महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस मानांकन स्पर्धाशिकची तनिषा कोटेचा आणि तिया वाघ

नाशिक : नाशिक जिमखाना येथे सुरू असलेल्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या तनिषा कोटचेने हिने सबज्युनिअरचे विजेतेपट पटकाविले.नाशिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने नाशिक जिमखाना येथे आयोजित तिसऱ्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस मानांकन स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी ज्युनियर, सबज्युनियर, कॅडेट आणि मिडजेट या चारही गटांचे अंतिम सामने खेळविले गेले. यामध्ये सब ज्युनीयर मुलींच्या गटात यजमान नाशिकची तनिषा कोटेचा आणि तिया वाघ यांच्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात तनिषाने जोमाने खेळ करून हा सामना ४-२ असा जिंकून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मिडजेट मुलांच्या गटात चौथा मानांकित परभणीचा वरद लोहाट आणि पुण्याच्या चौथा मानांकित अभिराज सकपाळ यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात वरद लोहाटने या सामन्यावर संपूर्ण पकड राखत हा सामना सरळ ४-२ असा जिंकून विजेतेपद पटकावले.मिडजेट मुलीमध्ये दुसरे मानांकित नभा किरकोले (पुणे ) आणि प्रथम मानांकित अकोल्याच्या रिया कोठारी यांच्यात अंतिम सामना पार पडला. सामन्यात २-२ अशी बरोबरी झाली. त्यामुळे सर्वांचे लक्ष लागलेल्या निर्णायक गेममध्ये नभा किरकोलेने सय्यमाने खेळ करून हा गेम ११-०६ असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव पक्के केले.कॅडेट मुलांच्या गटात चवथा मानांकित अक्षत जैन (मुंबई उपनगर ) आणि नील मुळे (पुणे) यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरच्या अक्षत जैनने ४-२ अशी लढत जिंकून विजेतेपद मिळविले.कॅडेट मुलीमध्ये केईशा झवेरी (मुंबई शहर) आणि सना डिसूझा (मुंबई उपनगर ) यांच्यात झालेला सामना चांगलाच रंगला. यामध्ये दोन्ही खेळाडूंनी ३-३ असा जिंकून चुरस निर्माण केली. परंतु शेवटच्या निर्णायक सेटमध्ये सना डिसूझाने सुरुवातीपासूनच आघाडी घेत हा गेम ११-०५ असा जिंकून या गटाचे विजेतेपद मिळविले.सबज्युनियर मुलांच्या गटात मुंबई उपनगरच्या हार्वेश असराणीने हा अंतिम सामना ३-१ असा जिंकून विजेतेपद पटकावले.ज्युनियर मुलीमध्ये अंतिम लढतीत मनुश्री पाटीलने तेजल कांबळेचा ३-१ असा पराभव करून या गटाचे विजेतेपद मिळविले, तर ज्युनियर मुलांमध्ये रंगतदार झालेल्या सामन्यात मुंबईच्या रेगन अल्बुकर्कने दोन गेमची आघाडी मिळविली, तर तिसरा गेम अश्विन सुब्रमणियमने जिंकून या सामन्यात रंगात आणली. परंतु रेगन अल्बुकर्कने नंतरच्या दोन गेममधे सहज सुंदर खेळ करून हा सामना ४-१ असा जिंकून मुलांच्या ज्युनियर गटाचे विजेतेपद पटकावले.

टॅग्स :NashikनाशिकSportsक्रीडा