शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
2
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
3
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
4
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
5
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
6
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
7
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
8
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
9
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
10
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
11
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
12
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
13
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
14
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
15
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
16
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
17
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
18
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
19
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
20
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर

गुन्ह्यांच्या शोधासाठी वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर करा : सतीश माथूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 23:04 IST

नाशिक : परदेशात गुन्ह्याची उकल करण्यासाठी वैज्ञानिक तंत्रज्ञान तसेच श्वान पथकाचा पुरेपूर वापर करून घेतला जातो़ मात्र आपल्याकडे उपलब्ध साधनसामग्री आणि तंत्रज्ञान याचा वापर कमी असल्याने त्याचा कामावर परिणाम होतो़ त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी या साधनांचा वापर करण्याचे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी केले़ महाराष्ट्र पोलीस अकादमीतील ...

ठळक मुद्देमहाराष्ट्र पोलीस अकादमीतील कर्तव्य मेळाव्याच्या समारोप

नाशिक : परदेशात गुन्ह्याची उकल करण्यासाठी वैज्ञानिक तंत्रज्ञान तसेच श्वान पथकाचा पुरेपूर वापर करून घेतला जातो़ मात्र आपल्याकडे उपलब्ध साधनसामग्री आणि तंत्रज्ञान याचा वापर कमी असल्याने त्याचा कामावर परिणाम होतो़ त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी या साधनांचा वापर करण्याचे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी केले़ महाराष्ट्र पोलीस अकादमीतील कर्तव्य मेळाव्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते़माथूर पुढे बोलताना म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवर सीसीटीएनएसचा वापर सुरू झाला असला तरी आपल्याकडे अजूनही या प्रणालीच्या वापराबाबत बºयाच अडचणी आहेत़ परदेशात गुन्ह्याची उकल करण्यासाठी श्वान पथकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो़ यामुळे आपल्याकडेही पथकांची संख्या वाढविली जात आहे़ महाराष्ट्र पोलीस दलात आजमितीस सव्वा दोन लाख पोलीस कर्मचारी आहेत़ पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी आॅनलाइन सुविधांचा वापर केल्यास नागरिकही याकडे नक्कीच वळतील़ पोलिसांनी गणेशोत्सव व ईद या सणांमध्ये राखलेली कायदा व सुव्यवस्थेची सरकारने नोंद घेत बक्षीस जाहीर केले असून, महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडल्याचे माथूर यांनी सांगितले़यावेळी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक एस. जगन्नाथन (प्रशिक्षण आणि विशेष शाखा), अकादमीचे संचालक विजयसिंग जाधव, अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे, संचालक रितेश कुमार, पोलीस महानिरीक्षक अनुपकुमार सिंग, सुनील रामानंद, विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, श्रीकांत तरवडे, डॉ. जय जाधव आदींसह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते़ प्रास्ताविक स्पर्धेचे संयोजक व गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी केले. पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी आभार मानले.