शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘संदर्भ’मध्ये अद्ययावत शिशुकक्षाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 22:52 IST

नाशिकमध्ये लेव्हल थ्रीचा अद्ययावत एसएनसीयू कक्षाबाबत चर्चा व परिस्थितीची विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी रविवारी (दि़१०) पाहणी केली़ त्यानुसार विभागीय संदर्भमध्ये स्वतंत्र कक्ष उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसोबत सोमवारी (दि़११) होणाºया बैठकीत मांडणार असल्याचे झगडे यांनी सांगितले़

ठळक मुद्देअर्भके मृत्यूप्रकरणी आज मुख्यमंत्र्यांकडे बैठकविभागीय आयुक्त महेश झगडे एसएनसीयू कक्षाबाबत चर्चा व पाहणी

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू विभागात बाहेरून उपचारासाठी दाखल केली जाणारी कमी वजनाच्या बाळांची मोठी संख्या, द्वितीय श्रेणीमध्ये मोडत असल्याने पीडिअ‍ॅट्रिक व्हेंटिलेटर सुविधेचा अभाव व त्यामुळे वाढणारे बालमृत्यू ही परिस्थिती सुधारण्यासाठी नाशिकमध्ये लेव्हल थ्रीचा अद्ययावत एसएनसीयू कक्षाबाबत चर्चा व परिस्थितीची विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी रविवारी (दि़१०) पाहणी केली़ त्यानुसार विभागीय संदर्भमध्ये स्वतंत्र कक्ष उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसोबत सोमवारी (दि़११) होणाºया बैठकीत मांडणार असल्याचे झगडे यांनी सांगितले़

विभागीय आयुक्त झगडे यांनी सायंकाळी जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू विभागास भेट देऊन लेव्हल थ्रीच्या स्वतंत्र एसएनसीयू कक्षाबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेमध्ये नाशिक जिल्हा रुग्णालय हे लेव्हल टूचे रुग्णालय असल्याने या ठिकाणी ते शक्य नाही, तर नाशिक महापालिकेला वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने यापूर्वीच परवानगी नाकारण्यात आली आहे़ यामुळे केवळ सुपरस्पेशालिटी संदर्भ रुग्णालयाचा एकमेव पर्याय आहे़जिल्हा रुग्णालयातील बालमृत्यू प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत सोमवारी (दि़११) होणाºया नियमित बैठकीत विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्याकडून संदर्भच्या पर्यायाबाबत प्रस्ताव दाखल केला जाण्याची शक्यता आहे़ झगडे यांनी जिल्हा रुग्णालयातील कक्षास भेट दिल्यानंतर मोठ्या संख्येने दाखल होणारी कमी वजनाची अर्भके व मर्यादित इन्क्युबेटर या परिस्थितीची कल्पना त्यांना देण्यात आली़जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात कमी वयात होणारे विवाह, कुपोषण व पोषक आहाराचा अभाव यामुळे गर्भाची वाढ होत नाही़ परिणामी कमी दिवसांची, वजनाची व कुपोषित अर्भके जन्मास येण्याचे प्रमाण अधिक आहे़ त्यातच खासगी रुग्णालयांमध्ये अशा मुलांवर उपचार करण्याची परिस्थिती नसल्याने अशी मुले जिल्हा रुग्णालयात पाठविली जातात़ इन्क्युबेटरमध्ये बालकाला ठेवण्यास प्रतिदिन मोठा खर्च येतो. हा खर्च करण्याची क्षमता गरीब लोकांमध्ये नसल्याने त्यांचा जिल्हा रुग्णालयाकडे ओढा असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले़दरम्यान, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय हे सुपरस्पेशालिटी असल्याने या ठिकाणी लेव्हल तीनचा एसएनसीयू कक्ष उभारला जाऊ शकतो़ त्यानुसार प्रस्ताव तयार करण्यात आला असून, मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावास मान्यता दिल्यास संदर्भमध्ये पीडिअ‍ॅट्रिक व्हेंटिलेटर असलेला एसएनसीयू विभाग उपलब्ध होणार आहे़