शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’त नाशिकचा सहभाग धूसर

By admin | Updated: December 9, 2015 23:51 IST

मनसेचा विरोध : ‘एसपीव्ही’ वगळूनच जाणार ठराव

नाशिक : केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेसंबंधी अनेक प्रश्न उपस्थित करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विरोधाची भूमिका घेतल्याने ‘स्मार्ट सिटी’योजनेत नाशिकच्या सहभागाची शक्यता धूसर बनली आहे. एकीकडे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम ‘एसपीव्ही’ (स्पेशल पर्पज व्हेइकल) शिवाय प्रस्ताव मान्य होणार नसल्याचे ठामपणे सांगत असताना सत्ताधारी मनसेने मात्र ‘एसपीव्ही’ वगळूनच ठराव पाठविण्याची तयारी केली आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील चॅलेंज स्पर्धेत उतरण्यापूर्वीच नाशिक महापालिकेचे आव्हान संपुष्टात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महापालिकेने दि. २ डिसेंबरला विशेष महासभेत ‘स्मार्ट सिटी’ अभियानाच्या प्रस्तावातील करवाढीला आणि एसपीव्ही अर्थात कंपनीकरणाला विरोध दर्शवित केवळ विकासाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे प्रशासनाची नव्याने प्रस्ताव तयार करताना मोठी तारांबळ उडाली. उत्पन्नाच्या अन्य स्त्रोतांची जमवाजमव करत प्रशासनाने दि. ५ डिसेंबरला संगणकीय सादरीकरण (पीपीटी) राज्य शासनाकडे केले. त्यात अतिरिक्त माहिती समाविष्ट करण्यासाठी प्रशासनाने दि. १३ डिसेंबरपर्यंत मुदत वाढवून घेतली आहे. एसपीव्ही हा योजनेचा मूळ गाभा असल्याने त्याशिवाय प्रस्ताव मंजूरच होणार नसल्याचे स्पष्टीकरण आयुक्त गेडाम यांनी दिले आहे. महासभेचा ठराव अद्याप प्रशासनाकडे प्राप्त न झाल्याने एसपीव्हीबाबत पुनर्विचाराची अपेक्षा प्रशासनाला असतानाच मुंबईत राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्मार्ट सिटी योजनेवर टीका करत केंद्र सरकारकडून केवळ श्रेय घेण्याचा हा डाव असल्याचे म्हटल्याने प्रशासनाच्या आशा आता मावळल्या आहेत. महापौर अशोक मुर्तडक यांनी बुधवारी मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेऊन स्मार्ट सिटी संबंधीच्या ठरावावर चर्चा केली. राज यांनीच आता विरोधाचीच भूमिका घेतल्याने महापौरांकडून ‘एसपीव्ही’ वगळूनच महासभेचा ठराव प्रशासनाला जाणार असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी स्पर्धेत नाशिक जवळपास बाद होण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान, मोदी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच सदर योजना राबविणे हिताचे असून एसपीव्हीला मनसेचा विरोध कायम राहणार असल्याचे मनसेचे गटनेते अनिल मटाले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)