नाशिक : महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये सुरू असलेल्या १५व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात रविवारी झालेल्या विविध स्पर्धांमधील अमली पदार्थ शोधकमध्ये नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील श्वान विभागातील पोलीस शिपाई एऩ पी़ बावीस्कर व व्ही़ के.पवार यांनी प्रशिक्षण दिलेल्या ‘मॅक्स’ श्वानाने सुवर्णपदक पटकावले आहे़ त्यांचा राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजयकुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ दरम्यान, सोमवारी या कर्तव्य मेळाव्याचा समारोप होणार असून, त्यास राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर उपस्थित असणार आहे़ महाराष्ट्र पोलीस अकादमीत रविवारी (दि़१७) सायंटिफिक एड टू इन्वेस्टिगेशन अंतर्गत झालेल्या लिफ्टिंग, पॅकिंग अॅण्ड लेबलिंग स्पर्धेमध्ये सहायक पोलीस निरीक्षक गिरीजा निंबाळकर (पुणे) यांना सुवर्ण, सहायक पोलीस निरीक्षक वाय. पी. पवार (नागपूर परिक्षेत्र) यांना रजत, तर सहायक पोलीस निरीक्षक शैलेजा बोबडे, पोलीस निरीक्षक बी. एम. जाधव (पुणे) यांनी कांस्यपदक मिळविले़ क्राइम फोटोग्राफी स्पर्धेत गिरिजा निंबाळकर (पुणे) यांना सुवर्णपदक, सहायक पोलीस निरीक्षक केशव धोंडिबा वाघ (नागपूर) यांना रजत, तर पोलीस उपनिरीक्षक आर. एस. वावरे (नाशिक परिक्षेत्र) यांना कांस्यपदक मिळविले. आॅब्झरवेशन स्पर्धेत पोलीस शिपाई अतुल पी. जाधव (कोल्हापूर परिक्षेत्र) यांनी सुवर्णपदक, हवालदार एस. एस. शिंदे (कोल्हापूर परिक्षेत्र) यांनी रजत, तर हवालदार मंगेश एन. राऊत (अमरावती परिक्षेत्र) यांनी कांस्यपदक मिळविले. पोलीस फोटोग्राफी स्पर्धेत पोलीस नाईक जयवंत एन. सादुल (कोल्हापूर परिक्षेत्र) यांना सुवर्ण, देवेंद्र एस. पिडूरकर (गडचिरोली परिक्षेत्र) यांनी रजत, तर चंद्रकांत के. कोंडे (पुणे) यांनी कांस्यपदक मिळविले़ एन्टी सबोटेज चेक अंतर्गत झालेल्या व्हेइकल सर्च स्पर्धेत पोलीस नाईक एस. एस. विच्चेवार (फोर्स वन) यांनी सुवर्ण, एन. एस. साळुंके (फोर्स वन) यांना रजत आणि ए. बी. घोरपडे (पुणे) यांनी कांस्यपदक मिळविले आहे. स्फोटक शोधक स्पर्धेत अमरावती परीक्षेत्रातील पोलीस नाईक एस़ टी़ जमधाडे, सहायक पोलीस निरीखक एस़ एऩ शिंदे व श्वान रॉकी यांनी सुवर्ण, पुणे शहर आयुक्तालयातील पोलीस शिपाई एस़ एस़ शिवले, आऱ एऩ धुमाळ व श्वान सूर्या यांनी रजत, तर मुंबई शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस हवालदार के़ सी़ राऊत व श्वान टायसन यांनी कांस्यपदक मिळविले़ या कर्तव्य मेळाव्यात राज्यभरातील २३ संघाचे ४७५ पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत.
नाशिकच्या ‘मॅक्स’ला सुवर्णपदक पोलीस कर्तव्य मेळावा : सोमवारी समारोप : महासंचालकांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:05 IST