नाशिक : नाशिकच्या पालकमंत्रिपदी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली असून, तशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमतच्या कार्यक्रमात केली आहे. भाजपा-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर पालकमंत्र्यांची अद्याप घोषणा झालेली नाही. तथापि, लोकमतच्या वतीने आयोजित बिझनेस आॅयकॉन्स आॅफ नाशिक या कॉफीटेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्यात फडणवीस यांनी गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री असल्याचे घोषित केले. कुंभमेळ्यासाठी गिरीश महाजन यांची नियुक्ती केली आहे. असे प्रथमच घडले असल्याचे लोकमतच्या वतीने घेण्यात आलेल्या मुलाखतीच्या दरम्यान त्यांनी सांगितले. फडणवीस यांनी पालकमंत्र्यांच्या नियुक्तीसंदर्भातील यादीवर आपण परवाच स्वाक्षरी केली आहे. कालच्या सुट्टीमुळे ते अद्याप ती प्रसिद्ध झाले नसल्याचे सांगितले.दरम्यान, शासनाच्या वतीने दुपारी पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यात नाशिकची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे, तर दादा भुसे यांच्याकडे धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
नाशिकच्या पालकमंत्रिपदी महाजन; भुसे यांच्याकडे धुळे
By admin | Updated: December 27, 2014 00:45 IST