संपत घोरपडे आणि अन्य काही संशयितांकडून धान्य काळ्याबाजारात विकले जात असल्याचे प्रकरण लक्षात आल्यानंतर तत्कालीन पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण पोलिसांना पत्र दिले होते. जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ तसेच काळाबाजार प्रतिबंध व जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याचे परीक्षण अधिनियम १९८० अन्वये कारवाई करण्यासाठी ग्रामीण पोलीस प्रयत्न करीत होते; अखेरीस त्यांच्यावर कारवाई देखील झाली. नाशिक पोलिसांनी मोक्का लावल्यानंतर त्यावेळी दाखल दोषारोपपत्र आणि गुन्हे यांच्या आधारे सक्त वसुली संचालनालयाच्या नागपूर येथील अधिकाऱ्यांनी चौकशी करून संपत नामदेव घोरपडे, अरुण नामदेव घोरपडे आणि विश्वास नामदेव घोरपडे यांना अटक केली. त्यांच्या संपर्कात अनेक राजकीय नेत्यांची नावे घेतली जातात. त्यामुळे ईडीची वक्रदृष्टी कोणाकडे आहे याकडे लक्ष लागून आहे.
ईडीच्या कारवाईमुळे नाशिकचा धान्य घोटाळा पुन्हा चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:41 IST