शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण पोलीस क्रीडा स्पर्धांचा शानदार समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 23:35 IST

नाशिक : ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जिल्हास्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धांचा शनिवारी (दि़१९) मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार समारोप झाला़ या क्रीडा स्पर्धेतील पुरुषांचे सांघिक विजेतेपद ग्रामीण पोलीस मुख्यालय संघाने तर महिलांमध्ये मनमाड विभागाने पटकावला,तर वैयक्तिक क्रीडा स्पर्धांमध्ये बेस्ट अ‍ॅथलिटचा किताब पुरुषांमध्ये सावळीराम शिंदे, तर महिलांमध्ये योगीता वाघ ...

ठळक मुद्देपुरुषांमध्ये ग्रामीण पोलीस मुख्यालय, तर महिलांमध्ये मनमाड विभागास सांघिक विजेतेपदसावळीराम शिंदे, तर महिलांमध्ये योगीता वाघ यांना बेस्ट अ‍ॅथलिटचा मान

नाशिक : ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जिल्हास्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धांचा शनिवारी (दि़१९) मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार समारोप झाला़ या क्रीडा स्पर्धेतील पुरुषांचे सांघिक विजेतेपद ग्रामीण पोलीस मुख्यालय संघाने तर महिलांमध्ये मनमाड विभागाने पटकावला,तर वैयक्तिक क्रीडा स्पर्धांमध्ये बेस्ट अ‍ॅथलिटचा किताब पुरुषांमध्ये सावळीराम शिंदे, तर महिलांमध्ये योगीता वाघ यांनी पटकाविला़ या स्पर्धेतील विजेत्यांना राष्ट्रीय धावपटू तथा अर्जुन पुरस्कार विजेती कविता राऊत व ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले़

आॅलिम्पिक अ‍ॅथलिट कविता राऊत यांनी सांगितले की, या स्पर्धांच्या माध्यमातून पोलीस दलाने ग्रामीण भागातील पोलीस खेळाडूंना संधी दिली असून, त्यांनीही संधीचे सोने केले आहे़या स्पर्धांमधूनच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतात़ खेळाडूंना आवश्यक ती मदत व सहकार्य गरजेचे असल्याचे सांगून आदिवासी पाड्यावरील एक मुलगी ते आंतरराष्ट्रीय असा स्वत:चा जीवनपटही यावेळी उलगडून दाखविला़, तर अधीक्षक संजय दराडे यांनी २४ तास कर्तव्यावर असणाºया पोलिसांवरील ताणतणाव कमी व्हावा त्यांचे आरोग्य चांगले व्हावे, सांघिक भावना वाढीस लागावी यासाठी स्पर्धा उपयुक्त असल्याचे सांगून परिक्षेत्र व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरणाºया खेळाडूंचे कौतुक केले़

प्रारंभी महिला व पुरुषांचे १०० मीटर धावण्याची स्पर्धा संपन्न झाली़ या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, हर्ष पोद्दार, पोलीस उपअधीक्षक अतुल झेंडे, दिलीप पगार, राखीव पोलीस निरीक्षक एन. बी. भदाणे, कोळी यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समालोचन पोलीस निरीक्षक विलास सोनवणे व प्राध्यापक सोपान देशमुख यांनी केले.सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीसुरगाणा तालुक्यातील सराड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शासकीय आश्रमशाळा व पेठ येथील पारंपरिक आदिवासी लोकनृत्य मंडळ यांनी आदिवासी व पावरी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली, तर निफाड तालुक्यातील कोठुरे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर तालीम व मल्लखांब संघाने सादर केलेल्या मल्लखांबावरील विविध कसरती व प्रात्यक्षिकांनी कार्यक्रमात रंगत आणली़ यानंतर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस खेळाडूंनी शानदार संचलन करून मानवंदना दिली.

क्रीडा स्पर्धेतील विजेतेसांघिक क्रीडा प्रकार : हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डीमध्ये पोलीस मुख्यालयाचे संघ प्रथम, कळवण विभाग द्वितीयवैयक्तिक क्रीडा प्रकार : जलतरण :- शिरीष चव्हाण (प्रथम, ), विनोद टिळे व बाळू भोर (द्वितीय), वेटलिफ्टिंग (पुरुष) : सचिन पिंगळ (प्रथम), रवींद्र टर्ले (व्दितीय), वेटलिफ्टिंग (महिला) : मनीषा खैरनार (प्रथम), बॉक्सिंग व कुस्ती (पुरुष) : सुजित म्हसदे, दशरथ पटले, कैलास मानकर, राकेश जाधव, योगेश पाटील, सुमित जाधव, प्रमोद जाधव, सुषांत मरकड, चंद्रभान झाल्टे, राजू मनोहर, बॉक्सिंग (महिला) : अस्मिता मंडई (प्रथम), मनीषा खांडेकर (द्वितीय), कबड्डी व खो-खो : कळवण (प्रथम), मनमाड (द्वितीय)