शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात प्रवासी महिलेवर रिक्षाचालकाचा बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 14:38 IST

आडगाव नाक्यावरील घटना : :लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : घरी जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या महिलेस नवीन आडगाव नाक्यावरील बसडेपो मागे नेऊन मारहाण करून बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ विशेष म्हणजे या प्रकारास पाच दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर नराधम रिक्षाचालकाने पुन्हा पिडीत महिलेला द्वारका येथून बळजबरीने रिक्षात बसविण्याचा प्रयत्न केला असता महिलेने पळ ...

ठळक मुद्देआडगाव नाक्यावरील घटना मारहाण करून अत्याचारनराधम रिक्षाचालक ताब्यात

आडगाव नाक्यावरील घटना : :लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : घरी जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या महिलेस नवीन आडगाव नाक्यावरील बसडेपो मागे नेऊन मारहाण करून बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ विशेष म्हणजे या प्रकारास पाच दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर नराधम रिक्षाचालकाने पुन्हा पिडीत महिलेला द्वारका येथून बळजबरीने रिक्षात बसविण्याचा प्रयत्न केला असता महिलेने पळ काढून पतीस सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रिक्षाचालकास ताब्यात घेण्यात आले आहे़पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरातील ३८ वर्षीय महिला मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते़ गुरुवारी (दि़६) दुपारी चार वाजेच्या सुमारास पिडीत महिला घरी जाण्यासाठी कन्नमवार पुलाजवळ उभी होती़ द्वारकेकडून आलेल्या एका रिक्षाचालकास तिने थांबवून बस डेपोजवळ जायचे आहे असे सांगितले़ यानंतर रिक्षात बसल्यानंतर रिक्षाचालकाने रिक्षा आडगाव नाक्यावरील बस डेपोच्या पाठीमागे नेऊन महिलेस मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर या महिलेने भितीपोटी या प्रकाराची वाच्यता न करता घरी निघून गेली़महिलेवर बलात्काराच्या घटनेस पाच दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर सोमवारी (दि.११) पिडीत महिला द्वारका येथे रिक्षाची वाट बघत असतांना पुन्हा तोच नराधम रिक्षाचालक तिथे आला व त्याने महिलेस पुन्हा बळजबरीने रिक्षात बसविण्याचा प्रयत्न केला़ मात्र, गतवेळच्या कटू अनुभवामुळे महिलेने सावधगिरी बाळगत स्वत:ची सुटका करून पळ काढला व संपूर्ण प्रकाराची माहिती आपल्या पतीला दिली़ यानंतर महिलेने पतीसह पंचवटी पोलिस ठाण्यात धाव घेत आपबिती कथन केली़ याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात त्या नराधम रिक्षाचालकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.