शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदात्रीनेच मुलीला ढकलले वेश्याव्यवसायात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 23:23 IST

नाशिक : आपल्या मुलीचे आयुष्य सुखकर व्हावे, यासाठी लहानपणापासून तिच्या प्राथमिक गरजा, त्यानंतर शिक्षण पूर्ण करून तिच्या वैवाहिक सुखी संसाराची आई-वडिलांना प्रतीक्षा असते़ मात्र स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी पोटच्या मुलीला मसाज सेंटरवर कामास लावून बळजबरीने वेश्याव्यवसायात ढकलल्याचे समोर आले आहे़ आपल्या जन्मदात्या आई-वडिलांविरोधात पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात पीडित मुलीनेच फिर्याद दिली असून, पिटान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्दे पीडित मुलीनेच दिली पोलीस ठाण्यात फिर्यादजन्मदात्या आई-वडिलांविरोधात पिटान्वये गुन्हा दाखल

नाशिक : आपल्या मुलीचे आयुष्य सुखकर व्हावे, यासाठी लहानपणापासून तिच्या प्राथमिक गरजा, त्यानंतर शिक्षण पूर्ण करून तिच्या वैवाहिक सुखी संसाराची आई-वडिलांना प्रतीक्षा असते़ मात्र स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी पोटच्या मुलीला मसाज सेंटरवर कामास लावून बळजबरीने वेश्याव्यवसायात ढकलल्याचे समोर आले आहे़ आपल्या जन्मदात्या आई-वडिलांविरोधात पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात पीडित मुलीनेच फिर्याद दिली असून, पिटान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पुण्याच्या येरवडा परिसरात राहणारे दाम्पत्य आपल्या अल्पवयीन सोळा वर्षीय मुलीसोबत २०१६ मध्ये नाशिक शहरात वास्तव्यासाठी आले होते़ पीडित मुलीच्या आईने स्वत: व आपल्या पतीच्या उदरनिर्वाहासाठी चक्क कॉलेजरोडवरील इजीडे मॉलसमोरील ठक्कर मॅजेस्टी व्यावसायिक संकुलाच्या दुसºया मजल्यावरील एन्झी स्पा-बॉडी टॅट्यू या मसाज सेंटरवर कामास लावले होते़ या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याने तिथे कामाला जाण्यास मुलीचा नकार होता़ मात्र तिच्या आईने बळजबरीने आपल्याला अधिक पैसे मिळणार, आपले घर कसे चालणार असे सांगत तिला वेश्याव्यवसायात ढकलले़एन्झी स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना मिळाली होती़ या माहितीनुसार ५ आॅक्टोबर २०१६ रोजी सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ व गंगापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी छापा टाकून स्पा सेंटरमधील व्यवस्थापक मुलीसह सहा मुलींना ताब्यात घेतले होते़ यानंतर स्पा सेंटरचा मालक हेमंत परिहार (वय ३२, रा. परम निवास, कल्पतरूनगर, अशोकामार्ग) विरोधात पिटान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़दरम्यान, या प्रकरणी पीडित मुलीने १ जानेवारी २०१८ रोजी वेश्याव्यवसायात ढकलणाºया आपल्या आई-वडिलांविरोधात पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पिटान्वये दाखल झालेला हा गुन्हा शहरातील गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत घडला असल्याने तो तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे़