शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातूनच सराईत गुन्हेगार मोरेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 23:30 IST

पंचवटी : दिंडोरी रोडवरील (कलानगर) येथे चार ते पाच संशयितांनी सराईत गुन्हेगार तथा अखिल भारतीय सेनेचा शहर अध्यक्ष निखिल ऊर्फ बाल्या मनोहर मोरे (२८) याची पूर्व वैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी (दि. १७) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात चार-पाच संशयितांवर ...

ठळक मुद्देदोन संशयित ताब्यात खुनाचा गुन्हा दाखल

पंचवटी : दिंडोरी रोडवरील (कलानगर) येथे चार ते पाच संशयितांनी सराईत गुन्हेगार तथा अखिल भारतीय सेनेचा शहर अध्यक्ष निखिल ऊर्फ बाल्या मनोहर मोरे (२८) याची पूर्व वैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी (दि. १७) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात चार-पाच संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरिफ कुरेशी व सागर चंद्रमोरे या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कलानगर परिसरातील निखिल मोरे याचा परिसरातच राहणारे संशयित आरोपी आरिफ कुरेशी, शरद पगारे, अमर गांगुर्डे, रोशन पगारे व त्यांच्या अन्य साथीदारांबरोबर पूर्वी वाद झाले होते. गुरुवारी (दि. १७) रात्री दहा वाजता सूरज खोडे, मयत निखिल मोरे, अमोल निकम हे कलानगर येथील व्यंकटेश कृपा अपार्टमेंट येथील हॅपी गेम झोन दुकानाच्या पायरीवर बसलेले होते़ त्यावेळी संशयित जॉन काजळे हा तिथे आला व निखिल मोरे यास तू प्रवीण काकडला आरिफ यास मारण्यास सांगतो असे म्हणून हातातील धारदार शस्त्राने मोरे याच्यावर वार केले़यानंतर संशयित शरद पगारे याने हातातील पिस्तुलातून तीन गोळ्या हवेत झाडल्या, तर मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या अमोल निकम व फिर्यादी खोडे यांच्यावरही अमर गांगुर्डे याने शस्त्राने वार केल्याने ते जखमी झाले़ तर आरिफ कुरेशी याने मोरेवर हातातील शस्त्राने वार केले. यानंतर संशयित पसार झाले. या घटनेचे वृत्त कळताच पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख, आनंदा वाघ, सुनीलकुमार पुजारी यांनी घटनास्थळी भेट दिली होती. या घटनेनंतर जखमी मोरेला दिंडोरी रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले़या प्रकरणी सूरज फकिरा खोडे याने दिलेल्या फिर्यादीनुसार म्हसरूळ पोलीस ठाण्यात चार ते पाच संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पगारे, कुरेशी तडीपाऱ़़सराईत गुन्हेगार निखिल मोरे याच्या खुनातील संशयित आरिफ कुरेशी यास काही दिवसांपूर्वीच शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते, तसेच त्याची तडीपारीची मुदत संपली होती. तर संशयित शरद पगारे यास पंधरवड्यापूर्वी म्हसरूळ पोलिसांनी तडीपार केले होते. मात्र, पगारे हा केवळ कागदोपत्री तडीपार होता. त्याचे वास्तव्य म्हसरूळ परिसरातच असल्याचे या प्रकरणामुळे स्पष्ट झाले असून, म्हसरूळ पोलिसांना याची माहिती कशी मिळाली नाही? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जाते आहे़मोरे सराईत गुन्हेगाऱ़़पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आलेला निखिल ऊर्फ बाल्या मोरे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, काही वर्षांपूर्वी कलानगर येथे भगवान सानप, ठक्कर बजार येथे गुणाजी जाधव या दोघांच्याही खून प्रकरणात मोरे याचा सहभाग असल्याने त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते़ तर काही दिवसांपूर्वीच पंचवटी पोलिसांनी महाबळेश्वर येथून अटक केलेला सराईत गुन्हेगार व्यंकटेश मोरे याचा मयत निखिल मोरे हा चुलतभाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.पोलीस अधिकाºयांचे मोरे सोबतचे फोटो व्हायरल़़़सराईत गुन्हेगार तथा अखिल भारतीय सेना शहर अध्यक्ष मयत निखिल मोरे याने काही दिवसांपूर्वीच म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांच्या समवेत एका कार्यक्रमाच्या ठिकाणी फोटो सेशन केले होते. मोरेच्या खुनानंतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी व निखिल मोरे यांच्यात जवळीक असल्याची चर्चा आहे.