शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कलाभूषण पुरस्काराने नामवंत कलाकारांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 23:13 IST

नाशिक : महाकवी वामनदादा कर्डक जयंती उत्सवानिमित्त शाहीर दत्ता वाघ यांच्यासह महाराष्ट्रातील अकरा नामवंत कलाकारांना माजी महापौर अशोक दिवे व मान्यवरांच्या हस्ते कलाभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले़ रविवारी (दि़२०) पंचवटीतील खांदवे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन महाकवी वामनदादा कर्डक संगीत कला मंचने केले होते़संकल्पित रिपाइंचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश ...

ठळक मुद्देमहाकवी वामनदादा कर्डक संगीत कला मंच; अकरा कलाकारांचा सत्कार

नाशिक : महाकवी वामनदादा कर्डक जयंती उत्सवानिमित्त शाहीर दत्ता वाघ यांच्यासह महाराष्ट्रातील अकरा नामवंत कलाकारांना माजी महापौर अशोक दिवे व मान्यवरांच्या हस्ते कलाभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले़ रविवारी (दि़२०) पंचवटीतील खांदवे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन महाकवी वामनदादा कर्डक संगीत कला मंचने केले होते़संकल्पित रिपाइंचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश पगारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात शाहीर दत्ता वाघ (नाशिक), विजयराज निकम (नाशिक), रूपचंद भुजबळ (मुंबई), अनिल बुकाणे (कल्याण), दिंगबर वाघ (ओझर), हरीष भालेराव (नाशिक), हनिफ सौदागर (नाशिकरोड), मधुकर घुसळे (कल्याण), उत्तम पगारे- सातपूर (मरणोत्तर), आनंद महिरे (मनमाड), शेख मास्टर (नाशिक) या अकरा कलाकारांना कलाभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला़यावेळी गायक विजयराज निकम, दिंगबर वाघ, शाहीर दत्ता वाघ या कलाकारांनी वामनदादा कर्डक यांना गीतांजलीतून अभिवादन केले़ त्यांना ढोलकीवर दादूजी घाटे, तबल्यावर राजेश भालेराव, संवादिनीवर हनिफ सौदागर, तर की-पॅडवर अमर जाधव व संदीप जाधव यांनी संगीतसाथ केली़ यावेळी नगरसेवक शांता हिरे, प्रियंका घाटे, शशी उन्हवणे, राहुल तूपलोंढे, दुष्यंत वाघ उपस्थित होते़ प्रज्ञा काळे यांनी सूत्रसंचालन केले़ माधवराव गायकवाड यांनी आभार मानले़ कार्यक्रमासाठी मंचचे सरचिटणीस फु लचंद जाधव व खजिनदार शंकर जाधव यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले़