शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पॅनकार्ड क्लब कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 23:30 IST

नाशिक : गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेऊन मुदत संपल्यानंतरही परतावा न देणाºया पॅनकार्ड क्लब कंपनीच्या संचालकांसह आठ संशयितांविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश बाबूराव पवार (रा़ राणाप्रताप चौक, सिडको) यांना पॅनकार्ड क्लब कंपनीचे संचालक संशयित सुधीर शंकर मोरावेकर, शोभा ...

ठळक मुद्देगुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष परतावा न देता उडवाउडवीची उत्तरे पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

नाशिक : गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेऊन मुदत संपल्यानंतरही परतावा न देणाºया पॅनकार्ड क्लब कंपनीच्या संचालकांसह आठ संशयितांविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश बाबूराव पवार (रा़ राणाप्रताप चौक, सिडको) यांना पॅनकार्ड क्लब कंपनीचे संचालक संशयित सुधीर शंकर मोरावेकर, शोभा रत्नाकर बर्डे, उषा अरुण तारी, मनीष कालिदास गांधी, चंद्रसेन गणपतराव भिसे, रामचंद्र रामकृष्ण (सर्व रा. मुंबई) व कंपनीचे नाशिकमधील शाखाधिकारी विक्रम अरिंगळे, एजंट बापूराव त्र्यंबक इंगळे यांनी संगनमत करून डिसेंबर २०१२ मध्ये कंपनीच्या विविध मुदत ठेवी योजनांची माहिती दिली. तसेच कंपनीत ठेवी केल्यास मुदतीनंतर त्वरित आकर्षक परतावा मिळेल, असे आश्वासन देऊन ५० हजार ४०० रुपयांची रक्कम ठेवण्यास प्रवृत्त केले़पॅनकार्ड क्लबमध्ये गुंतविलेल्या ठेवीची मुदत संपल्याने पवार यांनी संबंधितांकडे पैशांची मागणी केली असता परतावा न देता उडवाउडवीची उत्तरे दिली़ यामुळे विश्वासघात तसेच गुंतवणुकीचा अपहार करणाºयांविरोधात पवार यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधिताविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली़