शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्टच्या बहाण्याने वृद्धांचे दागिने लुटणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 20:47 IST

नाशिक : बसस्टॅण्ड तसेच रिक्षास्टॅण्डवर बसची वाट पाहणाºया वृद्ध महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना घरी सोडण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन दागिने लूटणारा संशयित योगेश सतिश कदम (२३, रा़दिक्षीरोड, ओझर, ता़निफाड, जि़नाशिक) यास आडगाव पोलिसांनी शनिवारी (दि़०२) सापळा रचून अटक केली़ कदम याने तीन गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यापैकी एका गुन्ह्यातील लाख ...

ठळक मुद्देआडगाव पोलिसांची कामगिरीओझरच्या संशयिताकडून तीन गुन्ह्यांची उकललाखाचा मुद्देमाल जप्त

नाशिक : बसस्टॅण्ड तसेच रिक्षास्टॅण्डवर बसची वाट पाहणाºया वृद्ध महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना घरी सोडण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन दागिने लूटणारा संशयित योगेश सतिश कदम (२३, रा़दिक्षीरोड, ओझर, ता़निफाड, जि़नाशिक) यास आडगाव पोलिसांनी शनिवारी (दि़०२) सापळा रचून अटक केली़ कदम याने तीन गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यापैकी एका गुन्ह्यातील लाख रुपयांची सोन्याची पोत त्याच्याकडून जप्त केल्याची माहिती माहिती सहायक पोलीस आयुक्त विजयकु मार चव्हाण व आडगावचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली़दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गावी जाण्यासाठी बसची वाट पाहत असलेल्या सईबाई बोडके (५५) या महिलेसोबत संशयित कदम याने ओळख करून घेत तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून आडगाव शिवारातील म्हसरूळ -आडगाव लिंकरोडवर नेले़ याठिकाणी बोडके यांच्या गळ्यातील ६५ हजार रुपये किमतीच्या ४ तोळे वजनाच्या दोन सोनसाखळ्या काढून घेतल्याची घटना मंगळवारी (दि़२९) दुपारी घडली होती़ या घटनेस एक दिवस उलटत नाही तोच पुन्हा बुधवारी (दि़ ३०) पुन्हा पिंपळगाव येथील विठाबाई रघुनाथ मोरे (६६) या वृद्धेस घरी सोडण्याच्या बहाण्याने कदम याने नवव्या मैलावर निर्जनस्थळी नेऊन त्यांच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोन्याची पोत लुटून नेली होती़वृद्धांना लुटण्याच्या या दोन घटनांनंतर आडगावचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर तसेच ग्रामीण भागातील रिक्षा तसेच बसस्टॉपवर पाळत ठेवली जात होती़ त्यातच गुप्त बातमीदाराद्वारे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयित कदम यास अटक केली़ त्याच्याकडून विठाबाई मोरे यांची लूट केलेली सोन्याची पात तोळ्याची पोतही जप्त करण्यात आली आहे़ संशयित कदम याने ओझर तसेच आडगाव पोलीस ठाणे हद्दीत एकूण तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे़ आडगाव गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील, पोलीस हवालदार मुनीरोद्दीन काझी, पोलीस नाईक अनिल केदारे, पोलीस शिपाई मनोज खैरे, वैभव खांडेकर, नकुल जाधव यांनी ही कामगिरी केली़लूटीसाठी अफलातून आयडीया

बसस्टॅण्ड, रिक्षास्टॅण्ड या ठिकाणी अंगावर सोन्याचे दागिने असणाºया वृद्ध महिलांशी ओळख काढत संशयित कदम हा त्यांचा विश्वास संपादन करायचा़ त्यानंतर या महिलांना आपल्या दुचाकीवर (एमएच १५, ईव्ही ९३९७) वर बसवून सोडण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी घेऊन जात असे़ यानंतर चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून फरार होत असे़ संशयित कदम याने लुटण्यासाठी अशी अफलातून आयडीया शोधून काढली होती़ त्यामुळे वृद्ध महिलांनी अनोळखी इसमांच्या दुचाकी वाहनांवर बसू नये़- विजयकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त, नाशिक़