शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध दाम्पत्यास बेघर करून दीड लाखांच्या दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 23:13 IST

नाशिक : वृद्ध दाम्पत्याच्या घराचे कुलूप तोडून सहा संशयितांनी सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेण्याबरोबरच त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन बेघर केल्याचा प्रकार टाकळी रोडवरील शंकरनगरमध्ये घडला आहे़ या प्रकारानंतर वृद्ध दाम्पत्याने न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने या सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल ...

ठळक मुद्देघराचे कुलूप तोडून सहा संशयितांनी सोन्याचे दागिने व रोकड चोरूनन्यायालयाने आदेश दिल्याने भद्रकाली पोलिसांनी केला गुन्हा दाखल

नाशिक : वृद्ध दाम्पत्याच्या घराचे कुलूप तोडून सहा संशयितांनी सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेण्याबरोबरच त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन बेघर केल्याचा प्रकार टाकळी रोडवरील शंकरनगरमध्ये घडला आहे़ या प्रकारानंतर वृद्ध दाम्पत्याने न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने या सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़सदाशिव त्र्यंबक काळे (६२, रा़ आशीर्वाद अपार्टमेंट, शंकरनगर, टाकळीरोड) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ज्योती राहुल काळे, रंजना सुरेश सोनवणे, सुरेश मुरलीधर सोनवणे, मधू सुरेश सोनवणे, संजय कटारे व संतोष साळवे या सहा संशयितांनी ९ जून ते ९ सप्टेंबर २०१७ या कालावधीत त्यांच्या टाकळी रोडवरील फ्लॅटचे कुलूप तोडून बेकायदेशीररीत्या प्रवेश केला़ तसेच घरातील १० हजार रुपये रोख, ८ तोळ्याचे मंगळसूत्र, ५ तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या असे १३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. तसेच काळे दाम्पत्यास जिवे मारण्याची धमकी देत बेघर केले़यामुळे बेघर झालेल्या सदाशिव काळे यांनी न्यायालयात धाव घेतली होती़ यावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी या सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश भद्रकाली पोलिसांना दिले होते़