शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गुन्हेगाराच्या खुनातील संशयितावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 23:04 IST

नाशिक : पेठरोड परिसरातील सराईत बालगुन्हेगार हृतिक उर्फ पाप्या राजू शेरगिलच्या खुनातील प्रमुख संशयित चेतन संजय पवार (१७, शनिमंदिरशेजारी, पेठरोड, नाशिक) याच्यावर शनिवारी (दि़१९) सायंकाळच्या सुमारास तीन ते पाच संशयितांनी तिबेटीयन मार्केटमध्ये धारदार शस्त्राने हल्ला केला़ यामध्ये पवार गंभीर जखमी झाला असून, त्यास प्रथम जिल्हा रुग्णालय व त्यानंतर खासगी हॉस्पिटलमध्ये ...

ठळक मुद्देतिबेटीयन मार्केटमधील घटनातीन-पाच संशयितांनी केले वार

नाशिक : पेठरोड परिसरातील सराईत बालगुन्हेगार हृतिक उर्फ पाप्या राजू शेरगिलच्या खुनातील प्रमुख संशयित चेतन संजय पवार (१७, शनिमंदिरशेजारी, पेठरोड, नाशिक) याच्यावर शनिवारी (दि़१९) सायंकाळच्या सुमारास तीन ते पाच संशयितांनी तिबेटीयन मार्केटमध्ये धारदार शस्त्राने हल्ला केला़ यामध्ये पवार गंभीर जखमी झाला असून, त्यास प्रथम जिल्हा रुग्णालय व त्यानंतर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेरगिलच्या खुनातील संशयित चेतन पवार याची शनिवारी (दि़१९) उंटवाडीतील बाल न्याय मंडळात तारीख होती़ त्यासाठी पवार हा आपल्या आई-वडिलांसमवेत तारखेसाठी हजर होता़ या तारखेनंतर कपडे खरेदी करावयाचे असल्याने साडेचार वाजेच्या सुमारास तो तिबेटीयन मार्केटमध्ये गेला होता़ यावेळी मागावर असलेल्या तीन ते पाच संशयितांनी धारदार हत्याराने त्याचे डोके व पाठीवर वार करून फरार झाले़ या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चेतन पवार यास त्याचे वडील संजय पवार व सतीश वानखेडे यांनी उपचारासाठी प्रथम जिल्हा रुग्णालय व त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल केले़या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त डॉ़राजू भुजबळ व सरकारवाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते़ या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, हल्लेखोरांची ओळख पटविण्याचे तसेच त्यांना शोधण्यासाठी पोलीस पथकही रवाना करण्यात आले आहे़ दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता़शेरगिल खुनातील प्रमुख संशयितपंचवटी परिसरात दहशत, प्राणघातक हल्ला, खून, हाणामारी, लूटमार, मोबाइल चोरीचे गुन्हे दाखल असलेला सराईत बालगुन्हेगार हृतिक उर्फ पाप्या राजू शेरगिल (१६) याचा संशयित गणेश अशोक भल्ला (रा. दिंडोरीरोड) व दोन अल्पवयीन शाळकरी मुलांनी धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना ७ फेबु्रवारी २०१७ रोजी पेठरोडवरील मोती सुपर मार्केटजवळ घडली होती़ या खुनातील संशयितांमध्ये प्राणघातक हल्ला करण्यात आलेल्या चेतन पवार याचाही समावेश होता़