शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अपहारातील २८ लाखांचा मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 21:42 IST

पंचवटी : दिंडोरीतील मद्यनिर्मिती कंपनीतून नांदेड जिल्ह्यासाठी पाठविलेल्या लाखो रुपये किंमतीच्या मद्यसाठ्याचा परस्पर अपहार करणाºया ट्रकचालक- मालकासह आठ संशयितांना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे़ या संशयितांकडून २८ लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त केला असून संशयितांवर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लॉजीस्टीक ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक धर्मेंद्र मंडलोई यांच्या सांगण्यावरून ...

ठळक मुद्देट्रकचालक- मालकासह आठ संशयितसंशयित संजय कांबळे फरारआडगाव पोलिसांची कामगिरी

पंचवटी : दिंडोरीतील मद्यनिर्मिती कंपनीतून नांदेड जिल्ह्यासाठी पाठविलेल्या लाखो रुपये किंमतीच्या मद्यसाठ्याचा परस्पर अपहार करणाºया ट्रकचालक- मालकासह आठ संशयितांना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे़ या संशयितांकडून २८ लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त केला असून संशयितांवर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लॉजीस्टीक ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक धर्मेंद्र मंडलोई यांच्या सांगण्यावरून आडगावमधील ओम ट्रान्सपोर्टचे चालक विजय कोठावले यांनी २७ जुलै रोजी दिंडोरीतील परनॉड रकार्ट इंडिया या मद्य कंपनीतून ट्रकचालक पोपट नाथा बागुल याचा मालट्रकमध्ये (एम. एच. १८ एम. २०२८) मध्ये ८४५ विदेशी दारूचे बॉक्स नांदेडला पाठविले़ यानंतर दोन दिवसानंतर ट्रकचालक बागुल यास विचारणा केली असता नांदेड जवळील गोटूर येथे ट्रक नादुरुस्त झाल्याचे सांगितले़कोठावले यांनी या ट्रकबाबत मंडलोई यांना कळविलेअसता संशय आल्याने मंडलोई हे खाजगी वाहनाने वाटूरकडे गेले व ट्रकची तपासणी केली असता ८४५ पैकी ३७६ बॉक्सचा अपहार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ या प्रकरणी त्यांनी प्रथम मंठा पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला मात्र तो आडगाव हद्दीत घडल्याने तो वर्ग करण्यात आला होता़ पोलिसांनी औरंगाबाद (वैजापूर) येथील ट्रकचालक पोपट बागूल व क्लिनर संदीप गायकवाड यांची कसून चौकशी केली़ त्यांनी ट्रकमालक शेख रऊफ शेख महंमद, मामू उर्फ लतिफ अब्दुल कादीर शेख (विनयनगर), विनय छगन राठोड (गंगाघाट), संजय विठ्ठल सोनवणे (गंगापूर),बाळासाहेब शंकर तांबडे (नवनाथनगर) यांच्या मदतीने मद्याचे बॉक्स केवडीबनातील एका चारचाकीत (एम. एच. १५ अ‍ेजी ६६८६) मध्ये लपवून ठेवल्याची कबुली दिली़आडगाव पोलिसांनी या सात संशयितांना अटक केली असून संजय कांबळे हा फरार आहे़ही कामगिरी पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंघल, पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस निरीक्षक सुनिलकुमार पुजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील, मुशीर काझी, संजीव जाधव, दत्ता खुळे, वैभव परदेशी, वैभव खांडेकर, यशवंत गांगुर्डे, अनिल केदार यांनी केली़