शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
2
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
3
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
4
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
5
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
6
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
7
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
8
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
9
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
10
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
11
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
12
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
13
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
14
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
15
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
16
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
17
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
18
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
19
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
20
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?

छोट्या पडद्यावर नाशिककरांचा दबदबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:10 IST

एकेकाळी चित्रपटांसह मनोरंजनपर विविध वाहिन्यांवर मुंबई-पुण्याची असलेली मक्तेदारी आता मोडीत निघाली आहे. सध्या छोटा पडदा नाशिकमधील गुणी कलावंतांनी व्यापला असून, टीआरपी लाभलेल्या बव्हंशी मालिकांमध्ये नाशिकचे कलावंत आपल्यातील प्रतिभासंपन्नतेचे दर्शन घडवित आहेत.

नाशिक : एकेकाळी चित्रपटांसह मनोरंजनपर विविध वाहिन्यांवर मुंबई-पुण्याची असलेली मक्तेदारी आता मोडीत निघाली आहे. सध्या छोटा पडदा नाशिकमधील गुणी कलावंतांनी व्यापला असून, टीआरपी लाभलेल्या बव्हंशी मालिकांमध्ये नाशिकचे कलावंत आपल्यातील प्रतिभासंपन्नतेचे दर्शन घडवित आहेत. चित्रमहर्षि दादासाहेब फाळकेंच्या भूमीत गेल्या दशकभरात गुणी अभिनेता-अभिनेत्रींची एक फळीच छोट्या-मोठ्या पडद्यावर आपले अस्तित्व टिकवून असल्याने नाशिककरांची मान उंचावली आहे.फाळकेंच्या जन्मभूमीतून कुसुमाग्रज-कानेटकर-बाबूराव बागुल-वामनदादा कर्डक यांच्यासारखी सारस्वत-शाहीर मंडळी नाशिकचा कीर्तीध्वज दिमाखात फडकवित राहिली. मात्र, रंगभूमीसह छोट्या-मोठ्या पडद्यावर ऐंशी-नव्वदच्या दशकानंतर फारशी उल्लेखनीय कामगिरी दिसून आली नाही.गेल्या दशकभरात मात्र जादूची कांडी फिरल्यागत छोट्या-मोठ्या पडद्यावर नाशिककरांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. सध्या तर छोटा पडदा नाशिकच्याच कलावंतांनी व्यापला आहे. त्यातही टीआरपी कमविलेल्या मालिकांमध्ये नाशिकचेच कलावंत आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवित आहेत. सध्या ‘माझ्या नवºयाची बायको’ ही मालिका टीआरपीमध्ये अव्वल मानली जात आहे. त्यात, राधिका-गुरुनाथची भूमिका साकारणारी जोडगोळी अनिता दाते व अभिजित खांडकेकर हे नाशिकचेच आहेत. याच मालिकेत नाशिकच्याच सुयोग गोरे यांनी छोटीशी भूमिका साकारत आपल्यातील अभिनयाचे दर्शन घडविले आहे. अभिजित खांडकेकरने तर अनेक मोठ्या सोहळ्यांच्या अ‍ॅँकरिंगचीही जबाबदारी समर्थपणे पेलली आहे.घराघरांत पोहोचलेली ‘काहे दिया परदेस’ या मालिकेत सध्या नाशिकच्याच सायली संजीव या अभिनेत्रीचा बोलबोला आहे. नाट्यपरिषदेचे सचिव असलेले अभिनेते दीपक करंजीवर तसेच विद्या करंजीकर हे सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या-मोठ्या पडद्यावर आपले स्थान टिकवून आहेत. तरुणाईचे आकर्षण ठरलेल्या ‘फुलपाखरू’ या मालिकेत नाशिकचाच चेतन वडनेरे भूमिका साकारत आहे, तर ‘नकोशी’ मालिकेत सिद्धार्थ बोडकेने आपल्यातील उत्तम अभिनयाचे दर्शन घडविले आहे. सध्या गोदावरी नदीसंवर्धनासाठी आणि प्रदूषणमुक्तीचा ध्यास घेतलेला नाशिकचा गुणी अभिनेता चिन्मय उद्गीरकर ‘घाटगे आणि सून’ या नुकत्याच सुरू झालेल्या मालिकेत झळकत आहे. ‘आस्स सासर सुरेख बाई’ या मालिकेत अभिनयासह संवाद लेखकाची भूमिका श्रीपाद देशपांडे सांभाळत आहे. धनश्री क्षीरसागर ही आणखी एक गुणी अभिनेत्री ‘लक्ष्य’ या मालिकेद्वारे घराघरांत पोहोचलेली आहे. कांचन पगारे हा सुद्धा कलावंत छोट्या पडद्यावरील जाहिरातींसह अ‍ॅँकरच्याही भूमिका उत्तमप्रकारे वठवत आहे. याशिवाय, दीपाली कुलकर्णी, अर्चना निपाणकर, किरण भालेराव, गणेश सरकटे, शर्मिष्ठा राऊत यांनीही छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची चुणूक दाखविलेली आहे. सध्या अमेरिकेत स्थायिक असलेल्या मृणाल दुसानीसने ‘माझ्याही प्रियाला प्रीत कळेना’ या सर्वाधिक टीआरपी लाभलेल्या मालिकेद्वारे नाशिकचे नाव घराघरांत नेऊन पोहोचविले. गुणी अभिनेत्री नेहा जोशी हिनेही ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘अवघाचि संसार’, ‘तू तिथे मी’, ‘सोनियाचा उंबरा’, ‘सुहासिनी’, ‘का रे दुरावा’ या लोकप्रिय मालिकांमधून प्रतिभासंपन्न अभिनयाचे दर्शन घडविले. सध्या मृणाल दुसानीस अमेरिकेत स्थायिक झालेली आहे, तर नेहा आता छोट्या पडद्याऐवजी चित्रपटांसह व्यावसायिक रंगभूमीवर सक्रिय झालेली आहे.