नाशिक : धावणे हा उत्तम व्यायाम असून त्याबाबत जागृती व्हावी, यासाठी नाशिक रनर्सच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सदस्यांनी कॉलेजरोडवरून जनजागृती रन घेतली. भोसला कॉलेजपासून कॉलेजरोड, कृषिनगर आणि तेथून पुन्हा भोसला कॉलेज अशी पाच किलोमीटर अंतराची रन आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. या रनमध्ये संयोजक अतुल संगमनेकर, सुजीत नायर, मृृदू कुलकर्णी, महिंंद्र छोरिया, तुषार पटवर्धन, विलास सानप, धिरज कांकरिया आदिंसह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते. रन फॉर यासाठी शास्त्रोक्त मार्गदर्शन करण्यात येणार असून, इच्छुकांनी महेंद्र छोरिया आणि सुजीत नायर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यदिनी धावले नाशिककर
By admin | Updated: August 18, 2016 01:28 IST