शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांनी अनुभवला ‘शून्य सावली दिवस

By admin | Updated: May 21, 2017 00:41 IST

’हा खेळ सावल्यांचा : भौगोलिक घटनेचा लुटला आनंद; सूर्य डोक्यावर सावली पायाखाली

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : उन्हाळ्याच्या रणरणत्या उन्हात शनिवारी (दि. २०) दुपारी नाशिककरांनी ‘शून्य सावली’ (झिरो शॅडो डे)चा अनुभव घेतला. निसर्ग तसेच भौगोलिक घडामोडींमुळे होणाऱ्या या घटनेत नाशिककरांनी सूर्य डोक्यावर आल्यानंतर आपली सावली अगदी पायाशी येऊन अदृश्य झाल्याचे अनुभवले.शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सूर्य डोक्यावर आल्यानंतर नाशिककरांनी आपली सावली पायाखाली येताच रस्त्यात थांबून आपल्या पायाखालील सावलीचे निरीक्षण केले. रस्त्यांप्रमाणेच मैदाने, क्रीडांगणे, घरांच्या छतावर नागरिकांनी शून्य सावलीचा अनुभव घेतला. डोक्यावर तळपता सूर्य असतानाही आपली सावली गायब झाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व आनंदाचे वातावरण बघायला मिळाले.पृथ्वीचा अक्ष तिच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेस लंब नसून तो साडेतेवीस अंशांनी कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवरील ॠ तू बदलतात आणि सूर्याचे दक्षिणायन आणि उत्तरायण सुरू होते. दररोज सूर्याेदयाची किंवा सूर्यास्ताची क्षितिजावरची जागा बदलते आणि वर्षातून दोनदा सूर्य डोक्यावर येण्याच्या घटना घडतात आणि यामुळे प्रत्येक सरळ उभ्या वस्तूची सावली बरोबर त्याच्या पायाजवळ असते आणि ती काही वेळाने नाहीशी होते. सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायनामुळे घडणारा हा अनुभव घेण्याची संधी राज्यातील नागरिकांना शुक्रवार (दि. २६)पर्यंत अशा वेगवेगळ्या दिवशी अनुभवता येणार आहे.