शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककर गारठले; कडाका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:15 IST

हवामान अन‌् हलक्या सरींचा वर्षाव अशा विचित्र वातावरणाचा नाशिककर आठवडाभरापूर्वी अनुभव घेत होते. मागील चार दिवसांपासून आकाश निरभ्र झाले ...

हवामान अन‌् हलक्या सरींचा वर्षाव अशा विचित्र वातावरणाचा नाशिककर आठवडाभरापूर्वी अनुभव घेत होते. मागील चार दिवसांपासून आकाश निरभ्र झाले असून लख्ख सूर्यप्रकाश पडत आहे. रविवारी कमाल तापमान २७.४ अंश तर किमान तापमान १२.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते. एका दिवसात किमान तापमानाचा पारा थेट पाच अंशांनी खाली घसरला.

शहराचे वातावरण थंड होऊ लागले असून किमान तापमानाचा पारा या आठवड्यात वेगाने घसरण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तविली जात आहे. उत्तरेकडील शीतलहरी राज्याच्या वेशीवर आल्याने शहराच्या वातावरणात अचानकपणे गारठा वाढू शकतो, असे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. ढगाळ स्थिती दूर झाल्यामुळे सध्या कोरडे वातावरण अनुभवयास येत आहे. अरबी समुद्रात मागील आठवड्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणातून थंडी गायब झाली होती. राज्यातील विविध शहरांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत किमान तापमानाचा पारा झपाट्याने खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विदर्भाला पुन्हा हुडहुडी भरू लागली असून सोमवारी गोंदिया येथे राज्यातील सर्वाधिक नीचांकी ७ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदविले गेले. त्याखालोखाल नागपूर, वर्धामध्ये पारा घसरला आहे. एकूणच विदर्भ गारठत असताना रविवारी संध्याकाळपासून उत्तर महाराष्ट्रातही थंड वाऱ्यांचा वेग वाढल्याचे दिसून आले.

---इन्फो---

ऊबदार कपडे खरीदेवर भर

थंडीचा कडाका वाढताच ऊबदार कपड्यांच्या खरेदीची नाशिककरांची लगबग बाजारपेठेत पाहावयास मिळत आहे. रविवारपासून शरणपूररोडवरील तिबेटियन बाजार, मेनरोड, शालीमार या भागातील दुकानांमध्ये ऊबदार कपडे खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी ऊबदार कपडे खरेदीवर भर दिला जात आहे.

--इन्फो--

शहराचे किमान तापमान असे.. (अंश सेल्सिअसमध्ये)

सोमवारी (दि.१४) - १८

मंगळवारी (दि.१५)- १५.४

बुधवारी (दि.१६)- १६

गुरुवारी (दि.१७)- १७

शुक्रवारी (दि. १८)- १५.१

शनिवारी (दि. १९)- १४.२

रविवारी (दि. २०)- १२.२

सोमवारी (दि. २१)- ९.१