शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
3
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
4
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
5
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
6
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
7
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
8
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
9
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
10
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
11
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
12
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
13
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
14
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
15
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
16
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
17
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
18
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
19
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
20
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?

नाशिककर गारठले; थंडीचा कडाका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:12 IST

हवामान अन‌् हलक्या सरींचा वर्षाव अशा विचित्र वातावरणाचा नाशिककर आठवडाभरापूर्वी अनुभव घेत होते. मागील चार दिवसांपासून आकाश निरभ्र झाले ...

हवामान अन‌् हलक्या सरींचा वर्षाव अशा विचित्र वातावरणाचा नाशिककर आठवडाभरापूर्वी अनुभव घेत होते. मागील चार दिवसांपासून आकाश निरभ्र झाले असून, लख्ख सूर्यप्रकाश पडत आहे. रविवारी कमाल तापमान २७.४ अंश तर किमान तापमान १२.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते. दोन दिवसात किमान तापमानाचा पारा थेट चार अंशांनी खाली घसरला.

शहराचे वातावरण थंड होऊ लागले असून, किमान तापमानाचा पारा या आठवड्यात वेगाने घसरण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तविली जात आहे. उत्तरेकडील शीतलहरी राज्याच्या वेशीवर आल्याने शहराच्या वातावरणात अचानक गारठा वाढू शकतो, असे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. ढगाळ स्थिती दूर झाल्यामुळे सध्या कोरडे वातावरण अनुभवयास येत आहे. अरबी समुद्रात मागील आठवड्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणातून थंडी गायब झाली होती. राज्यातील विविध शहरांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत किमान तापमानाचा पारा झपाट्याने खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहरात रविवारी सायंकाळपासून थंड वारे वेगाने वाहू लागल्याने वातावरणात कमालीचा गारठा जाणवत आहे. नागरिक शेकोट्या व उबदार कपड्यांचा आधार घेत थंडीपासून बचाव करत आहेत.

--इन्फो--

२०१८ ची पुनरावृत्तीची शक्यता

दोन वर्षांपूर्वी २९ डिसेंबर २०१८ रोजी नाशिक शहराच्या किमान तापमानाचा पारा ५.१ अंशापर्यंत घसरला होता. यावर्षी पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण मागील तीन दिवसांपासून तापमानात वेगाने घसरण होत आहे. त्याअगोदर २०१० साली डिसेंबर महिन्यात पारा ५.४ अंशापर्यंत घसरला होता. या दोन वर्षांत डिसेंबरअखेरीस नाशिककरांनी कडाक्याची थंडी अनुभवली होती. या वर्षांचा अपवाद वगळता जानेवारी, फेब्रुवारीमध्ये पारा ४ व ५ अंशापर्यंत घसरल्याची नोंद आहे.

---इन्फो---

उबदार कपडे खरिदेवर भर

थंडीचा कडाका वाढताच उबदार कपड्यांच्या खरेदीची नाशिककरांची लगबग बाजारपेठेत पाहावयास मिळत आहे. रविवारपासून शरणपूररोडवरील तिबेटियन बाजार, मेनरोड, शालीमार या भागातील दुकानांमध्ये उबदार कपडे खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उबदार कपडे खरेदीवर भर दिला जात आहे.

--इन्फो--

शहराचे किमान तापमान असे.. (अंश सेल्सिअसमध्ये)

सोमवारी (दि.१४) - १८

मंगळवारी (दि.१५)- १५.४

बुधवारी (दि.१६)- १६

गुरुवारी (दि.१७)- १७

शुक्रवारी (दि. १८)- १५.१

शनिवारी (दि. १९)- १४.२

रविवारी (दि. २०)- १२.२

सोमवारी (दि. २१)- ९.१

मंगळवारी (दि.२२)- ८.४