शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांनो, कृपया घरीच सुरक्षित राहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 23:47 IST

योगेश सगर । कसबे-सुकेणे : कोरोनाची परिस्थिती हाताळताना अमेरिकेत निष्काळजीपणा जिवावर बेतला आहे, परंतु अमेरिकेच्या तुलनेत भारताची लोकसंख्या मोठी ...

ठळक मुद्देअमेरिकेतील भारतीय युवा अभियंत्यांची साद : अमेरिकेला भोवला निष्काळजीपणा

योगेश सगर ।कसबे-सुकेणे : कोरोनाची परिस्थिती हाताळताना अमेरिकेत निष्काळजीपणा जिवावर बेतला आहे, परंतु अमेरिकेच्या तुलनेत भारताची लोकसंख्या मोठी आहे. मोठा धोका पत्करून चालणार नाही. म्हणून नाशिककरांनो ...प्लीज ...प्लीज घरीच थांबा... सुरक्षित राहा... अशी साद मूळचे नाशिककर पण सध्या अमेरिकेत नोकरीनिमित्त स्थायिक झालेल्या युवा अभियंत्यांनी नाशिककरांना घातली आहे.नाशिक शहर व जिल्ह्यातील बहुतांश उच्चशिक्षित तरुण अमेरिकेत शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत. यातील नाशिकचे दोन मेकॅनिकल इंजिनिअर परीक्षित कैलास घोगरे आणि प्रणव सुनील औंधकर या दोन युवकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अमेरिकेतील सद्यपरिस्थिती आणि उपाययोजना तसेच भारताने करावयाच्या उपाययोजना याविषयावर ‘लोकमत’शी संवाद साधला. नाशिक येथील डॉ. सुनील औंधकर यांचा मुलगा प्रणव हा अमेरिकेतील मिशिगन राज्यात डेट्रॉइट या जवळपास साडेसात लाख लोकवस्ती असलेल्या शहरात आॅटोमोबाइल हबमधील एका कंपनीत अभियंता म्हणून नोकरी करतो. कोरोनाबाबत प्रणव सांगतो, अमेरिका इतकी भयावह परिस्थिती प्रथमच अनुभवत आहे. आजमितीस मिशिगन स्टेटमधील फक्त अत्यावश्यक सेवा आणि त्यासंबंधी उत्पादन करणाऱ्या कंपन्या सुरू आहेत. जर तुम्ही क्वॉरण्टाइन सोडून घराबाहेर आलात तर येथील प्रशासन अमेरिकन एक हजार डॉलर दंड किंवा नव्वद दिवसांच्या तुरु ंगवासाची शिक्षा देते. मी गेल्या दोन आठवड्यांपासून घरात आहे. सध्या आम्हाला सॅनिटायझर, मास्क, टिश्यू पेपर, नॅपकिन यांचा मोठा तुटवडा भासत आहे. भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे. कम्युनिटी स्प्रेड होण्याची मोठी चिंता वाटते. त्यामुळे नाशिककरांनो प्लीज घरी थांबा, सरकारच्या सूचनांचे पालन करा, असेही प्रणव याने सांगितले. तर लासलगावजवळील पिंपळद-टाकळी येथील कैलास घोगरे यांचा मुलगा परीक्षित घोगरे हा नॉर्थ अमेरिकेतील शिकागोजवळील शेरॉन टाउन येथे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. परीक्षित म्हणतो, चीननंतर भारताला कोरोनाचा मोठा धोका असल्याने आम्हाला मायभूमीची चिंता सतावत होती, परंतु भारत सरकारने अचूक वेळ साधत केलेले लॉकडाउनसारखे प्रयत्न आणि भारतीयांनी पाळलेले सोशल डिस्टन्सिंग यामुळे भारतात कोरोनो आज तरी आम्हाला नियंत्रणात दिसत आहे. मी राहत असलेल्या नॉर्थ स्टेटमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असला तरी अमेरिकेच्या पूर्व भागातील सागरी किनाºयावरील मोठ्या शहरात त्याचा प्रादुर्भाव मोठा आहे. नाशिककरांनो, तुम्हीही घरीच थांबा, काळजी घ्या असे आवाहनही परीक्षितने केले आहे.इटलीनंतर अमेरिकेत कोरोना संसर्ग मोठा आहे. याला जबाबदार कोण असल्याचे विचारले असता, यावर या युवकांनी सांगितले की, अमेरिकेने सुरुवातीला लॉकडाउन उशिरा केले व ते राज्यानिहाय केले. काही प्रमाणात निष्काळजीपणाही केला. त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली, परंतु सध्या न्यूयॉर्कसारख्या मोठ्या शहरात परिस्थिती गंभीर असली तरी इतर राज्यात नियंत्रणात आहे. अमेरिकेत लॉकडाउन करताना भारताप्रमाणे अत्यावश्यक आणि अनावश्यक असे दोन भाग केले गेले आहे, त्यामुळे अमेरिकेत सध्या अत्यावश्यक सेवा सुरू असून, त्यासंबंधी उत्पादन घेणाºया कंपन्याही सुरू आहेत. भारताचे प्रयत्न अमेरिकेच्या तुलनेत योग्यच असल्याचे हे युवा अभियंते आवर्जून सांगतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य