शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग मतदारांची माहिती घेण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 18:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : मतदानापासून कोणताही घटक वंचित राहता कामा नये यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष दक्षता घेण्यात आलेली ...

ठळक मुद्देनिवडणूक विभाग : शासकीय यंत्रणेसह संघटनांचाही सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मतदानापासून कोणताही घटक वंचित राहता कामा नये यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष दक्षता घेण्यात आलेली असून, आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात दिव्यांग मतदारांची शोधमोहीमही सुरू करण्यात आलेली आहे. अशा प्रकारच्या मतदारांचा शोध घेऊन त्यांना विशेष सुविधा देण्यात येणार असल्याने मतदान केंद्रनिहाय त्यांची माहिती एकत्रित करण्याचे काम जिल्हा निवडणूक विभागाकडून केले जात आहे. अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यातील मतदारांची संख्या ४५ लाख इतकी आहे.मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आयोगाकडून विशेष खबरदारी घेतली जात असून, गेल्या दोन महिन्यांपासूनच जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीतील टक्का अपेक्षित नसल्याने विधानसभेत मतांचा टक्का वाढावा यासाठी आयोगाने कंबर कसली आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यात मतदार याद्यांचे शुद्धीकरण आणि अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. निर्दोष यादी करण्यासाठी निवडणूक शाखेने मोठी मोहीम राबविली आणि सुमारे ५६ हजार दुबार आणि मयत नावे यादीतून काढून टाकली. तर नव्याने १९ हजारांपेक्षा अधिक नावे यादीत समाविष्ट झाली. जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, जिल्ह्यातील मतदारांची संख्या ४५ लाख २४ हजार ६६३ मतदार विधानसभेसाठी मतदान करणार आहेत.लोकशाही व्यवस्था अधिकाधिक बळकट करण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करीत असून, त्याचाच एक भाग म्हणून मतदानापासून वंचित राहणाऱ्या घटकांची मतदार म्हणून नोंद करण्याची विशेष मोहीम राबविली जात आहे. विधानसभेच्या मतदार यादीतील स्त्री आणि पुरुष मतदारांप्रमाणेच तृतीय पंथियांचीदेखील नोंदणी करण्यात आली असून, जिल्ह्यात ३५ तृतीयपंथी मतदार असल्याची नोंद अंतिम मतदार यादीत करण्यात आलेली आहे.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक