शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील आयसीआयसीआय बँकेत ४१ बनावट नोटांचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 13:50 IST

नाशिक : चलनातील बनावट नोटा असल्याचे माहिती असूनही त्याजवळ बाळगून त्यांचा आयसीआयसीआय बँकेत भरणा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीस आयुक्तालयात बनावट चलनाचा दाखल होणारा २०१७ मधील हा सातवा गुन्हा आहे़आयसीआयसीआय बँकेचे अधिकारी विनय चंद्रात्रे (हिरावाडी रोड, ...

ठळक मुद्देअकरा महिन्यांच्या कालावधीत सात गुन्हे दाखल

नाशिक : चलनातील बनावट नोटा असल्याचे माहिती असूनही त्याजवळ बाळगून त्यांचा आयसीआयसीआय बँकेत भरणा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीस आयुक्तालयात बनावट चलनाचा दाखल होणारा २०१७ मधील हा सातवा गुन्हा आहे़आयसीआयसीआय बँकेचे अधिकारी विनय चंद्रात्रे (हिरावाडी रोड, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २ जानेवारी २०१७ ते २६ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत बँकेच्या कालिकामंदिर व बोधलेनगर शाखेत संशयिताने ४१ बनावट नोटांचा बँकेत भरणा केला़ या बनावट नोटांमध्ये १००, ५०० व १००० रुपये दराच्या नोटा असून त्यांचे मूल्य २९ हजार ७०० रुपये इतके आहे़ पोलीस आयुक्तालयात आतापर्यंत दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत ६ लाख ४ हजार ८०० रुपयांचे बनावट चलन बँकामध्ये भरण्यात आल्याचे समोर आले आहे़दरम्यान, या नोटा बनावट व नकली असल्याचे माहिती असूनही संशयिताने त्या कब्जात बाळगल्या व त्यांचा बँकेत भरणा करून त्या चलनात आणल्या़ या प्रकरणी चंद्रात्रे यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

अकरा महिन्यांच्या कालावधीत सात गुन्हे दाखलनोटाबंदीनंतर शहर पोलीस आयुक्तालयात बनावट चलनाचे सहा गुन्हे दाखल आहेत़ जानेवारी २०१७ ते आॅक्टोबर २०१७ या दहा महिन्यांच्या कालावधीत सरकारवाडा, मुंबई नाका, अंबड, आडगाव व भद्रकाली या पाच पोलीस ठाण्यांमध्ये बनावट चलनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ राष्ट्रीय तसेच खासगी बँकेच्या व्यवस्थापकांनी दाखल केलेल्या या गुन्ह्यांमध्ये पाच लाख ७५ हजार १०० रुपयांच्या बनावट नोटांचा भरणा बँकांमध्ये करण्यात आला आहे़