शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील इन्क्युबेटरची संख्या वाढविणार : दीपक सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 19:31 IST

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील एनआयसीयू युनिटमध्ये उपचार सुरू असलेल्या नवजात अर्भकांच्या वाढत्या मृत्यूची गंभीर दखल घेत राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी शनिवारी (दि़९) अचानक जिल्हा रुग्णालयास भेट देत एनआयसीयू युनिटची तपासणी केली़ नवजात अर्भकांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र शासनाचे निकष बाजूला सारत सद्यस्थितीत आणखी पाच ते सात व महिनाभरात ...

ठळक मुद्दे नाशिक जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट एनआयसीयू युनिटची तपासणीसुमारे चौदा इन्क्युबेटर वाढणारपीडिअ‍ॅट्रिक व्हेंटिलेटर पुरविण्याची ग्वाही

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील एनआयसीयू युनिटमध्ये उपचार सुरू असलेल्या नवजात अर्भकांच्या वाढत्या मृत्यूची गंभीर दखल घेत राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी शनिवारी (दि़९) अचानक जिल्हा रुग्णालयास भेट देत एनआयसीयू युनिटची तपासणी केली़ नवजात अर्भकांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र शासनाचे निकष बाजूला सारत सद्यस्थितीत आणखी पाच ते सात व महिनाभरात आणखी पाच ते सात अशा सुमारे चौदा इन्क्युबेटरची संख्या वाढविण्यात येणार असून, पीडिअ‍ॅट्रिक व्हेंटिलेटर पुरविण्याची ग्वाही दीपक सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली़

जिल्हा रुग्णालयातील एनआयसीयू (न्यू बेबी स्पेशल केअर युनिट)मध्ये गत पाच महिन्यांत १८७, तर आॅगस्टमध्ये ५५ तर सप्टेंबरमध्ये १५ अर्भकांचा मृत्यू झाला आहे़ या विभागात उपचारासाठी दाखल करण्यात येणाºया नवजात अर्भकांच्या संख्येमुळे विभागातील १८ इन्क्युबेटरमध्ये प्रत्येकी चार अर्भक ठेवली जात असल्याचे वास्तव प्रसिद्धी माध्यमांनी समोर आणले होते़ याबाबत शुक्रवारी (दि़८) मंत्रालयात बैठक झाल्यानंतर शनिवारी डॉ़ सावंत यांनी जिल्हा रुग्णालयास आरोग्य सचिवांसह अचानक भेट देऊन एनआयसीयू युनिटची पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली़

यावेळी, डॉ़ सावंत यांनी सांगितले की, जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाºया नवजात अर्भकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, प्रतिवर्ष ५० हजार इतकी झाली आहे़ धुळे, नंदुरबार, जव्हार, वाडा, मोखाडा या ठिकाणांसह तीनशे किलोमीटरहून बालके या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले जातात़ जिल्ह्यातील ५६ टक्के तर बाहेरील जिल्ह्यातील ४४ टक्के नवजात बालके उपचारासाठी दाखल होत असून, बाहेरील मुलांमध्ये इन्फेक्शनचे प्रमाण अधिक असते़ त्यात ५०० ग्रॅम व एक किलोच्या आत वजन असलेल्या बालकांची संख्या अधिक असल्याने त्यांना वाचविणे हे एक आव्हान असते़बालमृत्यूबाबत आपण अधिक संवेदनशील असून, पालघर जिल्ह्याचा बालमृत्यूदर कमी करण्यात यश आले आहे़ याच धर्तीवर नाशिक जिल्हा रुग्णालयासाठी केंद्र शासनाचे निकष बदलून इन्क्युबेटरची संख्या १४ ने वाढविली जाईल तसेच पीडिअ‍ॅट्रिक व्हेंटिलेटर पुरविण्याची ग्वाही आरोग्यमंत्री सावंत यांनी दिली़वृक्षांचा अडथळा येत्या आठ दिवसांत दूरनवजात अर्भकांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात स्वंतत्र इमारत बांधली जाणार असून, त्यासाठी २१ कोटी रुपयांचा निधीही शासनाने मंजूर केलेला आहे़ मात्र या इमारतीसाठी असलेला वृक्षांचा अडथळा येत्या आठ दिवसांत दूर करून तोडगा काढला जाणार आहे़ याबाबत मुख्यमंत्री व आरोग्य सचिव महापालिका आयुक्तांशी बोलले असून, हा अडथळा दूर होऊन लवकरच कामास सुरुवात होईल, असे आरोग्यमंत्री सावंत यांनी सांगितले़