शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक शेलार यांच्या अटकेचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:04 IST

नाशिक : गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषणाची पातळी ओलांडून डीजे वाजविल्याप्रकरणी भद्रकाली व सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गजानन शेलार यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी सोमवारी (दि़११) फेटाळला़ यामुळे शेलार यांच्या अटकेबाबत पोलिसांसमोरील अडथळा दूर झाला ते फरार झाले ...

ठळक मुद्देअंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर ; प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे ध्वनिप्रदूषणाची पातळी ओलांडून डीजे वाजविल्याप्रकरणी गुन्हा दाखलअटकेसाठी पोलिसांची व्यूहरचना; उच्च न्यायालयात मागणार दाद

नाशिक : गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषणाची पातळी ओलांडून डीजे वाजविल्याप्रकरणी भद्रकाली व सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गजानन शेलार यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी सोमवारी (दि़११) फेटाळला़ यामुळे शेलार यांच्या अटकेबाबत पोलिसांसमोरील अडथळा दूर झाला ते फरार झाले आहेत़ दरम्यान, उर्वरित वारे व कर्पे या दोन संशयितांचे अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आले आहेत़ध्वनिप्रदूषणाची पातळी ओलांडून डिजे वाजविल्याप्रकरणी भद्रकाली व सरकारवाडा पोलिसांनी दंडे हनुमान मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष गजानन शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला़ यांनतर नामको बँक तसेच शहरात खुलेआम फिरणाºया नानांऐवजी मंडळाच्या पदाधिकाºयांना अटक करण्याचा फार्स पोलीस यंत्रणेने राबवून नानांना अटकपूर्वसाठी पुरेपूर संधी दिली़ यांनतर नानांनीही या संधीचा फायदा घेत जिल्हा न्यायालयात अटकपूर्वसाठी अर्ज दाखल केला़ यावर युक्तिवाद होऊन सोमवारी निर्णय होणार होता़प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या न्यायालयात दुपारी सरकारी वकील व शेलार यांचे वकील अ‍ॅड़ राहुल कासलीवाल यांनी युक्तिवाद केला़ शासकीय विश्रामगृहातील कर्मचाºयाने त्यात शेलार यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले़ यानंतर न्यायाधीश शिंदे यांनी नगरसेवक गजानन शेलार यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करून दुर्गेश दिलीप वारे (३८, आझाद चौक, जुने नािशक) व मयूर ऊर्फ देवेंद्र मुरलीधर कर्पे (३४, रा़ बुधवार पेठ, जुने नाशिक) यांचा अर्ज मंजूर केला़ दरम्यान, याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे शेलार यांच्या वकिलाने सांगितले़