शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ संबंधांची वाच्यता न करण्यासाठी खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:49 IST

नाशिक : एका समाजातील चार दाम्पत्यांपैकी दोन दाम्पत्यांमधील अनैतिक संबंधाच्या संशयावरून केलेल्या कॉल रेकॉर्डिंगच्या सीडी तयार करण्यासाठी खर्च झालेले दोन लाख तीन हजार रुपये न दिल्यास सदर रेकॉर्डिंग हे समाजातील जात पंचायत तसेच मुलीच्या शाळेत पसरवून बदनामी करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे़ याप्रकरणी मुंबई नाका ...

ठळक मुद्देएकाच समाजातील चार मित्र अनैतिक संबंधाच्या संशयावरून कॉल रेकॉर्डिंगरेकॉर्डिंग सीडी जात पंचायत व मुलीच्या शाळेत पसरवून बदनामीची धमकी

नाशिक : एका समाजातील चार दाम्पत्यांपैकी दोन दाम्पत्यांमधील अनैतिक संबंधाच्या संशयावरून केलेल्या कॉल रेकॉर्डिंगच्या सीडी तयार करण्यासाठी खर्च झालेले दोन लाख तीन हजार रुपये न दिल्यास सदर रेकॉर्डिंग हे समाजातील जात पंचायत तसेच मुलीच्या शाळेत पसरवून बदनामी करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे़ याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात खंडणीची मागणी करणाºया महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़शहरात एकाच समाजातील चार मित्रांची अनेक वर्षांपासून मैत्री असून त्यांचे सहपरिवार एकमेकांच्या घरी येणे-जाणे आहे़ या मित्रांपैकी संजय व सुशीलची पत्नी मीना यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय संजयची पत्नी शालू व मीनाचा नवरा सुशील (नावे बदलली आहेत़) यांना होता़ त्यामुळे शालूने या अनैतिक संबंधांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला़ शालूने जानेवारी २०१७ पासून ते आजपर्यंत संजय व मीना यांचे मोबाइलवरील अनैतिक संबंधांचे पुरावे असलेले संभाषण रेकॉर्ड करून त्याच्या सीडी तयार केल्या़ या सीडीसाठी शालूला दोन लाख तीस हजार रुपये खर्च आला व तिने सुशीलकडे या खर्चाची मागणी केली़ मात्र हे पैसे देण्यास सुशीलने नकार दिल्याने संजय व मीना यांच्या अनैतिक संबंधांच्या संभाषणाच्या सीडी समाजातील जात पंचायत तसेच सुशीलच्या मुलीच्या शाळेत पसरवून बदनामी करण्याची धमकी शालूने दिली़या प्रकारामुळे सुशील याने मुंबई नाका पोलीस ठाणे गाठून शालूच्या विरोधात खंडणी तसेच बदनामीची फिर्याद दिली़ या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एच़ एच़ शेजवळ करीत आहेत़