शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

वृद्धाश्रमातील वृद्धांना कायद्याचे ज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 21:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : संपूर्ण आयुष्य आपल्या मुलांसाठी कष्ट करणाºया व उतारवयात त्याच मुलांकडून अपमानास्पद जीवन जगावे लागे नये यासाठी २००७ मध्ये आई-वडील व वरीष्ठ नागरिकांचे कल्याण व पालनपोषण अधिनियम काढण्यात आला़ मात्र, अजुनही या नियमाबाबत जनजागृती झालेली नसून वृद्धांना याबाबत माहितीच नाही़ त्यामुळे वृद्धांना आपल्या अधिकारांची व नियमांची माहिती ...

ठळक मुद्देजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रमवृद्धाश्रमात रक्षाबंधन

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : संपूर्ण आयुष्य आपल्या मुलांसाठी कष्ट करणाºया व उतारवयात त्याच मुलांकडून अपमानास्पद जीवन जगावे लागे नये यासाठी २००७ मध्ये आई-वडील व वरीष्ठ नागरिकांचे कल्याण व पालनपोषण अधिनियम काढण्यात आला़ मात्र, अजुनही या नियमाबाबत जनजागृती झालेली नसून वृद्धांना याबाबत माहितीच नाही़ त्यामुळे वृद्धांना आपल्या अधिकारांची व नियमांची माहिती व्हावी यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे ‘यू आर नॉट अलोन’या मोहिमेतंर्गत पाथर्डी शिवारातील वृद्धाश्रमात रक्षाबंधनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस़एम़बुक्के यांनी सांगितले की, वृद्ध हे एकटे नसून त्याच्या मदतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदैव तत्पर आहे़वृद्धांसाठी असलेल्या अधिनियमातील तरतुदीनुसार वरीष्ठ नागरिक हे स्वत:च्या कमाईने किंवा असलेल्या संपत्तीचे पालन पोषण करण्यास असमर्थ आहेत ती आपल्या मुलाच्या विरूद्ध किंवा आपल्या नातेवाईकाच्या विरूद्ध पोटगीचा दावा करू शकतात़ या अर्जावर मुलांना किंवा नातेवाईकांना नोटीसीची बजावणी झाल्यापासून ९० दिवसांच्या आत या अर्जावर हुकूम होणे आवश्यक आहे़ पालन पोषणासाठी देण्यात येणारी रक्कम राज्यशासनाने ठरवून दिलेली असेल व त्याप्रमाणे देण्याचे आदेश न्यायाधिकरण देऊ शकते मात्र ही रक्कम प्रतिमहिना दहा हजार रुपयांपेक्षा अधिक असणार नाही़ तसेच या कायद्यानुसार सरकारी दवाखाने अंशत: किंवा पूर्ण अनुदान प्राप्त दवाखान्यात वरीष्इठ नागरिकांकरीता पलंग व्यवस्था असणे आवश्यक असल्याचे बुक्के यांनी सांगितली़यावेळी वृद्धांनी न्यायाधीश बुक्के यांच्याकडे आपले विविध प्रश्न मांडले़ त्यानंतर बुक्के यांना वृद्ध महिलांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले़ मानवसेवा केअर सेंटरच्या संचालक ललीता नवसागर व टी़नवसागर यांनी मान्यवरांचे आभार मानले़